लसीकरणात नाशिक राज्यात अव्वल क्रमांकावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2019 08:04 PM2019-12-11T20:04:50+5:302019-12-11T20:07:23+5:30
नाशिक जिल्ह्याने राज्यांमध्ये प्रथम क्रमांकावर लसीकरणाचे काम केले. त्यानंतर दुसºया क्रमांकावर सातारा, त्यानंतर सोलापूर, रत्नागिरी आणि उस्मानाबाद जिल्ह्यांचा क्रमांक लागतो.
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : आरोग्य खात्याच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या मिशन इंद्रधनुष्य लसीकरण मोहिमेत वंचित राहिलेल्या राज्यातील गरोदर माता व बालकांसाठी दि. २ ते ९ डिसेंबर दरम्यान राबविण्यात आलेल्या मिशन इंद्रधनुष्य दोन योजनेत नाशिक जिल्ह्याने राज्यात अव्वल क्रमांक पटकाविला आहे. वंचित राहिलेले बालक व मातांना ११ टक्के लसीकरणाचे काम करून सातारा, सोलापूर आदी जिल्ह्यांना मागे टाकले आहे.
नाशिक जिल्ह्यामध्ये २ ते ९ डिसेंबर दरम्यान, मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश्वरी एस. यांचे मार्गदर्शनाखाली नगरपालिका, महानगरपालिका व ग्रामीण भागात विषेश मिशन इंद्रधनुष्य २.० ही लसीकरण मोहिम राबविण्यात आल्या. त्यात नाशिक जिल्ह्याने राज्यांमध्ये प्रथम क्रमांकावर लसीकरणाचे काम केले. त्यानंतर दुसºया क्रमांकावर सातारा, त्यानंतर सोलापूर, रत्नागिरी आणि उस्मानाबाद जिल्ह्यांचा क्रमांक लागतो. या मोहिमेत लसीकरणापासून वंचित राहिलेल्या जिल्ह्यातील ४,२५३ बालकांपैकी ४,५५२ बालकांना वरील कालावधीमध्ये लस देण्यात आली. यामध्ये बाहेरगावाहून आलेल्या बालकांचाही समावेश असून, जिल्ह्यातील १४०३ गरोदर मातांपैकी हे १५३९ गरोदर मातांना लस देण्यात आली. यामध्ये बाहेरगावाहून आलेल्या ऊसतोड, वीटभट्टी, कामगार बांधकामाचे मजूर इत्यादी महिलांचा समावेश असून, जिल्ह्यात १११ टक्के लसी करणाचे काम झाले आहे. ही लसीकरण मोहीम पुढील तीन महिने राबविण्यात येणार असून, पुढील दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी सुरू होऊन पुढील सात दिवस चालणार आहे. त्यामध्ये सुटीचे दिवस वगळण्यात येऊन ही मोहीम सुरू राहणार आहे. जिल्ह्यातील या मोहिमेचे सर्व सनियंत्रण जिल्हास्तरावरील परिवेक्षक तसेच तालुका आरोग्य अधिकारी वैद्यकीय अधिकारी यांनी केले तर गाव पातळीवरील आशा, आरोग्य सेवक, सेविका, आरोग्य सहायक, आरोग्य सहाय्यीकांचा मोलाचा वाटा आहे. या कार्यक्रमाची प्रसिद्धी विविध माध्यमांचा वापर करून करण्यात आली असून, पुढील तीन महिने लसीकरणापासून वंचित राहिलेल्या बालकांना या मोहीम काळामध्ये लसीकरण करून संरक्षित करावे, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश्वरी एस., जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विजय डेकाटे, जिल्हा माता बालसंगोपन अधिकारी डॉ. रवींद्र चौधरी, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दावल साळवे, सहायक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शैलेश निकम यांनी केले आहे.