नाशिक ‘हॉट’

By admin | Published: March 23, 2017 12:43 AM2017-03-23T00:43:08+5:302017-03-23T00:43:20+5:30

नाशिक : नाशिककरांना उन्हाच्या तीव्र झळा सोसाव्या लागत असून, सूर्य तळपू लागल्याने बुधवारी (दि. २२) कमाल तपमानाचा पारा संध्याकाळी साडेपाच वाजता ३७.३ अंशावर स्थिरावला.

Nashik 'Hot' | नाशिक ‘हॉट’

नाशिक ‘हॉट’

Next

नाशिक : नाशिककरांना उन्हाच्या तीव्र झळा सोसाव्या लागत असून, सूर्य तळपू लागल्याने बुधवारी (दि. २२) कमाल तपमानाचा पारा संध्याकाळी साडेपाच वाजता ३७.३ अंशावर स्थिरावला. यामुळे दिवसभर नाशिककर घामाघूम झाले होते. या हंगामातील कमाल तपमानाचा सर्वाधिक उच्चांक बुधवारी पेठरोडवरील हवामान खात्याच्या कार्यालयात नोंदविला गेला. गेल्या वर्षी २२ मार्च रोजी ३७.८ अंश इतक्या कमाल तपमानाची नोंद करण्यात आली होती. थंड हवामानाचे शहर म्हणून ओळख असलेल्या नाशिककरांना गेल्या वर्षाप्रमाणेच यंदाही तीव्र उन्हाळ्याचा सामना करावा लागणार असल्याचे चित्र आहे. कारण मार्चच्या अखेरच्या आठवड्यापासून कमाल तपमानाचा पारा अधिक वाढत असून, एप्रिल व मे महिन्यात कमाल तपमानाचा पारा चाळिशीच्या वर सरकरण्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तविला जात आहे. कारण या महिन्यातच पारा चाळिशीपर्यंत जाऊ शकतो. बुधवारी सकाळपासूनच ऊन तापायला सुरुवात झाली होती. अकरा वाजेनंतर उन्हाचा कडक चटका शहरात जाणवत होता. यामुळे शहरातील कॉलन्या रस्त्यांसह प्रमुख रस्त्यांवरही शुकशुकाट पसरला होता. सायंकाळी सहा वाजेनंतर वाऱ्याचा वेग वाढल्याने नाशिककरांना दिलासा मिळाला. नाशिककरांनी आल्हाददायक वातावरणाची अनुभूती घेण्यासाठी सूर्यास्तानंतर गोदापार्क, गोदाघाट, फाळके स्मारक, पंडित जवाहरलाल नेहरू वनोद्यान, सोमेश्वर धबधबा परिसरात गर्दी केली  होती. (प्रतिनिधी)

Web Title: Nashik 'Hot'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.