Nashik: ‘मी  स्वत:चा शेवट करतेय...’ पतीला व्हिडिओ कॉल करून पत्नीने संपवले जीवन

By नजीर शेख | Published: September 10, 2023 03:48 PM2023-09-10T15:48:00+5:302023-09-10T15:48:49+5:30

Nashik News: सामनगावरोडवरील गाडेकर मळ्यात राहणाऱ्या एका तीस वर्षीय विवाहितेने पतीसोबत व्हिडिओ कॉलवर संवाद साधून ‘मी आत्महत्या करत आहे, ’ असे सांगून राहत्या घरात गळफास घेत जीवनप्रवास संपविल्याची धक्कादायक घटना घडली.

Nashik: 'I am ending myself...' Wife ends life by video calling husband | Nashik: ‘मी  स्वत:चा शेवट करतेय...’ पतीला व्हिडिओ कॉल करून पत्नीने संपवले जीवन

Nashik: ‘मी  स्वत:चा शेवट करतेय...’ पतीला व्हिडिओ कॉल करून पत्नीने संपवले जीवन

googlenewsNext

- अझहर शेख  
नाशिक- सामनगावरोडवरील गाडेकर मळ्यात राहणाऱ्या एका तीस वर्षीय विवाहितेने पतीसोबत व्हिडिओ कॉलवर संवाद साधून ‘मी आत्महत्या करत आहे, ’ असे सांगून राहत्या घरात गळफास घेत जीवनप्रवास संपविल्याची धक्कादायक घटना घडली. याप्रकरणी नाशिकरोड पोलिस ठाण्यात अकस्मात नोंद करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसा विवाहिता मनाली प्रसाद गवळी हिने शनिवारी (दि.९) संध्याकाळी सहा वाजेच्या सुमारास पती प्रसाद संजय गवळी यांच्याशी व्हिडिओ कॉलवर संवाद साधला. यावेळी मनाली हिने त्यांना ‘मी आत्महत्या करीत आहे....’ असे सांगितले. यानंतर प्रसाद गवळी हे बाहेर असल्याने त्यांनी तातडीने मनालीचा मानलेला भाऊ आकाश मोरे (२७,रा.पळसे) याच्याशी संपर्क साधून माहिती देत त्वरित घरी पाठविले.

यावेळी आकाश याने गाडेकर मळ्यातील घरी जाऊन दरवाजाच्या फटीतून बघितले असता मनाली यांनी गळफास घेतल्याचे त्यास दिसले. दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला असता दरवाजा आतमधून बंद केलेला हाेता. त्याने त्वरित नाशिकरोड पोलिसांना याबाबत खबर दिली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. मनाली गवळी यांच्या आत्महत्येमागील नेमके कारण स्पष्ट होऊ शकलेले नाही. याप्रकरणी नाशिकरोड पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. पुढील तपास पोलीस नाईक पाटील हे करीत आहेत.

Web Title: Nashik: 'I am ending myself...' Wife ends life by video calling husband

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.