VIDEO: पॅराशूट भरकटल्यानं जवान झाडावर अडकला अन्...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2020 11:17 AM2020-03-11T11:17:50+5:302020-03-11T11:29:43+5:30

अग्निशमन दलानं झाड तोडून जवानाची केली सुटका

in nashik jawan trapped on tree after his parachute missed direction kkg | VIDEO: पॅराशूट भरकटल्यानं जवान झाडावर अडकला अन्...

VIDEO: पॅराशूट भरकटल्यानं जवान झाडावर अडकला अन्...

Next
ठळक मुद्देपॅराशूटद्वारे जमिनीवर उडी मारण्याचे प्रात्यक्षिक करताना घडली घटनाअग्निशमन दलाच्या जवानांकडून सुखरुप सुटकाझाड तोडून जवानाची सुटका; जवानाला कोणतीही इजा नाही

नाशिक: शहरातील गांधी नगर येथे विमानातून पॅराशूटद्वारे जमिनीवर उडी मारण्याचे प्रात्यक्षिक करणाऱ्या एका जवानाला भलताच त्रास सहन करावा लागला. त्याचे पॅराशूट उपनगर येथील एका बाभळीच्या झाडावर अडकले. काट्याकुट्यात अडकलेल्या जवानाची नाशिक महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी झाड तोडून सुटका केली. आज सकाळी साडेनऊ वाजता हा प्रकार घडला.

आर्टिलरी सेंटर येथील केंद्रात वैमानिकांना प्रशिक्षण दिले जाते. त्याअंतर्गत विमानातून पॅराशूटद्वारे उतरण्याचे प्रशिक्षणही दिले जाते. असे प्रशिक्षण घेत असलेल्या काही जणांनी आज सकाळी एका विमानातून 13 हजार फुटांवरून उडी मारली. त्यापैकी हनिफ नापा या लष्करी जवानाचे पॅराशूट वारा सुटल्याने भरकटले. यानंतर हनिफ नापा उपनगरातील अमित काठे यांच्या शेतात असलेल्या बाभळीच्या झाडावर अडकले. 



अमित कोठे यांनी झाडाची फांदी तोडून नापा यांची सुटका करण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यात त्यांना अपयश आलं. यानंतर त्यांनी नाशिक महापालिकेच्या अग्निशमन दलाला घटनेची माहिती दिली. त्यानुसार नाशिक शहरातील शिंगाडा तलाव आणि पंचवटी येथील अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी येऊन झाड तोडले आणि त्या जवानाची सुखरुप सुटका केली. नापा यांना कोणतीही इजा झाली नसल्याची माहिती अग्निशमन दलाच्या जवानांनी दिली.

Web Title: in nashik jawan trapped on tree after his parachute missed direction kkg

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.