'कालिदास'सारखा उफराटा नियम संपूर्ण महाराष्ट्रात नाही : सुप्रिया पाठारे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2019 04:22 PM2019-08-25T16:22:14+5:302019-08-25T16:23:09+5:30
संपूर्ण महाराष्ट्रात नाटकाचे भाडे किंवा अर्धे भाडेच कापून घेण्याचा नियम आहे. मग नाशिकमध्येच वेगळा नियम का ? असा कलाकाराला पडलेला प्रश्न आहे. हा नुकसानकारक नियम त्वरीत बदलावा, हीच कलाकारांची मागणी आहे.
धनंजय रिसोडकर
नाशिक : मी प्रचंड आजारी पडल्याने माझा नाशिक आणि ठाण्यातील नाटकाचा प्रयोग रद्द करावा लागला. ठाण्यातील रंगायतनने केवळ नाटक भाडय़ातील अर्धी रक्कम कापली. तर नाशिकच्या कालिदास नाटय़गृहाने आमच्या नाटकाच्या भाडय़ाची पूर्ण रक्कम तसेच डिपॉङिाटदेखील जप्त केले. असा उफराटा न्याय आम्ही संपूर्ण महाराष्ट्रात कुठेच बघितलेला नाही. अशाने नाशिकला नाटके आणायलादेखील निर्माते फेरविचार करतील, अशा शब्दात प्रख्यात अभिनेत्री सुप्रिया पाठारे यांनी त्यांचा रोष व्यक्त केला.
जुलै महिन्यात 12 तारखेला माङया ह्यदहा बाय दहाह्ण या नाटकाचा नाशकात प्रयोग होता. त्याआधी 5 तारखेला मी प्रचंड आजारी झाले. त्याचवेळी पडल्याने माङया हाताला आणि बरगडीला दुखापत झाली. 5 दिवसात मला 56 सलाईनच्या बाटल्या लावायला लागल्या. इतकी गंभीर आजारी असल्याने माङया नाटकाचा ठाण्यातील रंगायतनला असलेला 1क् तारखेचा प्रयोग आणि नाशिकचा 12 जुलैचा प्रयोग रद्द करावा लागला. अशा परिस्थितीत रंगायतनने नियमानुसार केवळ नाटकाचे अर्धे भाडे जप्त केले. मात्र, नाशिकच्या कालिदासने निर्मात्याचे नाटकाचे पूर्ण भाडे आणि डिपॉङिाट अशा दोन्ही रकमा जप्त करून घेतल्या. अशा स्वरुपाची अपवादात्मक परिस्थिती अगदी कधीतरीच येत असते. त्या परिस्थितीत नाटकाच्या जाहीरातीचा खर्च आधीच वाया गेलेला असतो. त्यात नाटकाचे भाडे आणि डिपॉङिाट अशा दोन्ही रकमा जप्त झाल्या, तर निर्माते आणि नाटय़ व्यावसायिकांचे प्रचंड नुकसान होते. त्यामुळेच संपूर्ण महाराष्ट्रात नाटकाचे भाडे किंवा अर्धे भाडेच कापून घेण्याचा नियम आहे. मग नाशिकमध्येच वेगळा नियम का ? असा कलाकाराला पडलेला प्रश्न आहे. हा नुकसानकारक नियम त्वरीत बदलावा, हीच कलाकारांची मागणी आहे.
नाटय़ क्षेत्रचे नुकसान
कालिदाससारख्या या अनाकलनीय नियमामुळे निर्मात्याचे मोठे नुकसान होत आहे. मात्र, हे नुकसान केवळ निर्मात्याचे नसून नाटय़चळवळीचे असल्याचे मत प्रख्यात विनोदी अभिनेते विजय पाटकर यांनी केले. अशा प्रकारामुळे नाशिकला कोणीही नाटय़निर्माता नाटक आणण्यापूर्वी दहावेळा विचार करेल. नाटक रद्द झाल्यास नियमानुसार भाडे कापून घ्या. पण पूर्ण डिपॉङिाट जप्त करणो हा नियमच काढून टाकण्याची गरज आहे. गत महिन्यात ह्यदहा बाय दहाह्णच्या प्रयोगावेळी सुप्रिया आयसीयुमध्ये दाखल होती. त्यामुळे डिपॉङिाट जप्त करण्याचा घातकी नियम सर्वप्रथम बदलावा, असेही पाटकर यांनी नमूद केले.