नाशिक : कालिका मंदिरात चोरी, सोन्याचा मुकूट, चांदीचे दागिने लंपास

By admin | Published: January 23, 2017 11:46 AM2017-01-23T11:46:18+5:302017-01-23T11:47:38+5:30

नाशिकमधील अशोक स्तंभ येथील कालिका मंदिरात चोरी झाली असून देवीचा सोन्याचा मुकूट आणि चांदीचे काही दागिने लंपास करण्यात आले आहेत.

Nashik: In the Kalika temple, theft, gold crown, silver ornaments lamps | नाशिक : कालिका मंदिरात चोरी, सोन्याचा मुकूट, चांदीचे दागिने लंपास

नाशिक : कालिका मंदिरात चोरी, सोन्याचा मुकूट, चांदीचे दागिने लंपास

Next
ऑनलाइन लोकमत
नाशिक, दि २३ - नाशिकमधील अशोक स्तंभ येथील कालिका मंदिरात चोरी झाली असून देवीचा सोन्याचा मुकूट आणि चांदीचे काही दागिने लंपास करण्यात आले आहेत. 
सोमवारी मध्यरात्री दोनच्या सुमारास चोरटयानी मंदिरात हात साफ केल्याचे समजते. चोरांनी सुमारे 40 ते 50 हजारांचे चांदीचे दागिने घेऊन पोबारा केला आहे. 
सारकरवाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सीताराम कोल्हे, यांच्या पथकाने मंदिराला भेट देऊन पाहणी केली असून   सीसीटीव्ही फुटेजची तपासले आहे. 
गुन्हेगारांचा माग काढण्यासाठी पोलिसांनी श्वान पथकालाही पाचारण केले.  सर्व पोलिस ठाणे हद्दीत तसेच ग्रामीण पोलीस हद्दीत देखील नाकाबंदीच्या सूचना देण्यात आल्या आहेत. 

 

Web Title: Nashik: In the Kalika temple, theft, gold crown, silver ornaments lamps

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.