नाशिक-कल्याण लोकल सेवा लवकरच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2019 06:51 PM2019-01-24T18:51:59+5:302019-01-24T18:54:25+5:30
लोकमत न्युज नेटवर्क नाशिक : नाशिककरांच्या नाशिक- मुंबई प्रवासासाठी महत्त्व पूर्ण ठरणारी नाशिक-कल्याण लोकल सेवा १० फेब्रुवारी नंतर कधीही ...
लोकमत न्युज नेटवर्क
नाशिक : नाशिककरांच्या नाशिक- मुंबई प्रवासासाठी महत्त्व पूर्ण ठरणारी नाशिक-कल्याण लोकल सेवा १० फेब्रुवारी नंतर कधीही सुरू होण्याची दाट शक्यता निर्माण झाली असून, या लोकलच्या डब्याची निर्मिती पुर्ण होवून ते ३० जानेवारीपर्यंत मुंबईच्या कुर्ला वर्कशॉपमध्ये पुढील प्रक्रियेसाठी पाठविण्यात येणार असल्याची माहिती खासदार हेमंत गोडसे यांनी दिली.
नाशिककरांसाठी महत्वपूर्ण असलेली नाशिक कल्याण लोकल ही चेन्नई येथील सवारी डिब्बा कारखाना या ठिकाणी पूर्णत्वाच्या मार्गावर असून 30 जानेवारीपर्यंत कुर्ला वर्कशॉपमध्ये येण्याची दाट शक्यता आहे. या ठिकाणी पाच ते सहा दिवसात काम पूर्ण करून ७ फेब्रुवारी नंतर धावण्यास सज्ज होणार आहे. खासदार हेमंत गोडसे यांनी चेन्नई येथील इंटिग्रलकॉच फॅक्टरी या ठिकाणी भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली. त्यावेळेस प्रिन्सिपल चीफ मेकॅनिकल इंजिनीअर्स शुभ राशी यांची भेट घेतली ही लोकल चालू झाल्यानंतर एकाच वेळीसुमारे दोन हजार प्रवासी येण्या-जाण्याचा लाभ घेऊ शकतात. यामुळे इगतपुरी, घोटी, लहवीत, देवळाली कॅम्प आणि नाशिकच्या शेतकरी, उद्योजकांना दळणवळणाचे मोठे साधन उपलब्ध होणार आहे.
चौकट===
अडीच तासात कल्याण
नाशिक -कल्याण लोकलचा प्रवास अडीच तासात होणार आहे यासाठी प्रतिताशी शंभर किलोमीटर वेगाने लोकल धावणार असून, लोकलमध्ये महिलांसाठी फर्स्ट क्लास स्पेशल कोच, अपंगांसाठी एक कंपार्टमेंट राहणार आहे तसेच लोकलला बारा डबे राहणार असून, तीन कोचेस मिळवून एक युनिट राहणार आहे. प्रत्येक युनिटमध्ये एक इंजिन राहणार आहे.
प्रतिक्रिया====