नाशिक-कल्याण मार्गावर लोकल नव्हे ‘डेमो लोकल’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2019 01:55 AM2019-02-06T01:55:35+5:302019-02-06T01:55:53+5:30

नाशिककरांना प्रतीक्षा असलेली नाशिक-कल्याण लोकल सेवा येत्या आठ दिवसांत कधीही सुरू होऊ शकते, असे जाहीर करण्यात आले असले तरी प्रत्यक्षात कसारा घाटात लोकलची चाचणी अपयशी ठरल्यामुळे नाशिक-कल्याण मार्गावर लोकल नव्हे, तर ‘डेमो लोकल’ धावणार असल्याची माहिती समोर आली आहे.

Nashik-Kalyan route is not local but 'demo local' | नाशिक-कल्याण मार्गावर लोकल नव्हे ‘डेमो लोकल’

नाशिक-कल्याण मार्गावर लोकल नव्हे ‘डेमो लोकल’

googlenewsNext
ठळक मुद्देघाटात चाचणी फेल : बाह्यभाग एक्स्प्रेसचा, तर अंतर्गत रचना लोकलसारखी

नाशिक : नाशिककरांना प्रतीक्षा असलेली नाशिक-कल्याण लोकल सेवा येत्या आठ दिवसांत कधीही सुरू होऊ शकते, असे जाहीर करण्यात आले असले तरी प्रत्यक्षात कसारा घाटात लोकलची चाचणी अपयशी ठरल्यामुळे नाशिक-कल्याण मार्गावर लोकल नव्हे, तर ‘डेमो लोकल’ धावणार असल्याची माहिती समोर आली आहे.
नाशिककरांच्या नाशिक-मुंबई प्रवासासाठी कल्याणपर्यंतची लोकल महत्त्वाचा दुवा ठरणार असल्यामुळे तमाम नाशिककरांना लोकल गाडी सुरू होण्याची प्रतीक्षा आहे. या मार्गासाठी लोकल सज्ज असून, फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत कधीही नाशिक-कल्याण मार्गावर लोकल धावू शकते, असे जाहीर करण्यात आले आहे. या लोकलमुळे अडीच तासांत कल्याण गाठता येणार असल्याचे बोलले गेले. या लोकलमुळे सुमारे दोन हजार प्रवाशांची येण्या-जाण्याची सोय होणार असल्याचेही सांगण्यात आले. त्यामुळे साहजिकच नाशिककरांना लोकल सेवेची प्रतीक्षा आहे. परंतु नाशिक-कल्याण दरम्यान असलेल्या कसारा घाटात लोकलचे ब्रेक सक्षम नसल्याने नियमित लोकल धावणे अशक्य झाल्याने नाशिक मार्गावर डेमो लोकल सुरू करण्याचा पर्याय समोर आला़ सध्या अशा प्रकारची लोकल दिवा-वसई, पनवेल, अहमदाबाद-जोधपूर, तसेच डहाणू- सुरत मार्गावर सुरू असल्याचे समजते. मुुंबईहून नाशिक आणि पुणे प्रवासासाठी तयार करण्यात आलेली विशेष लोकल म्हणजेच डेमो लोकल असून हीच लोकल घाटात धावू शकते. त्यामुळे नाशिकलादेखील डेमो लोकल दाखल होणार असल्याची माहिती मध्य रेल्वेच्या भुसावळ डिव्हिजन सूत्रांनी दिली.
लोकल असो वा डेमो लोकल नाशिककरांना पर्याय म्हणून लोकल गाडी मिळणार असल्याने नाशिककरांमध्ये आनंद व्यक्त होत आहे.
३२ बे्रक्सची डेमो लोकल
मुंबईत धावणाºया लोकल या बंबर्डीयर लोकल असतात. या लोकलला १६ ब्रेक असतात. प्लेन सरफेस मार्गावर या लोकल सहज धावू शकतता. परंतु घाटात मात्र या लोकल धावू शकत नाही. त्यामुळेच कसारा घाटात लोकलची चाचणी अपयशी झाल्याने डेमो लोकलचा पर्याय समोर आल्याने आता अशीच लोकल नाशिकला मिळणार आहे. डेमो लोकलला ३२ ब्रेक असतात़ या लोकलची बांधणी मद्रासच्या कारखान्यात करण्यात आलेली आहे. डेमो लोकलची बाह्य बाजू ही नियमित एक्स्प्रेस गाड्यांसारखी असते, तर अंतर्गत रचना मात्र लोकलसारखी केलेली असते. यामध्ये टॉयलेटची व्यवस्था नसते. डेमो लोकलमध्ये गाडीच्या मध्यभागी अधिक क्षमतेचे इंजिन असते. कंट्रोलिंग मात्र पुढच्या इंजिनमध्ये असते.

Web Title: Nashik-Kalyan route is not local but 'demo local'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.