नाशिक कृउबाचा ‘ई-नाम’ योजनेत समावेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2018 12:14 AM2018-09-25T00:14:37+5:302018-09-25T00:15:00+5:30
केंद्र शासनामार्फत शेतमालाच्या खरेदी-विक्रीसाठी राष्ट्रीय कृषी बाजार ई-नाम योजना राज्यातील ६० बाजार समितीत राबविण्यात येत असून, नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीची ई-नाम योजनेसाठी दुसऱ्या टप्प्यात निवड झाली असून, शेतकºयांनी या योजनेत आपले नाव नोंदणी करावी, असे आवाहन बाजार समितीने केले आहे.
पंचवटी : केंद्र शासनामार्फत शेतमालाच्या खरेदी-विक्रीसाठी राष्ट्रीय कृषी बाजार ई-नाम योजना राज्यातील ६० बाजार समितीत राबविण्यात येत असून, नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीची ई-नाम योजनेसाठी दुसऱ्या टप्प्यात निवड झाली असून, शेतकºयांनी या योजनेत आपले नाव नोंदणी करावी, असे आवाहन बाजार समितीने केले आहे. शेतक-यांच्या मालाला योग्य हमीभाव मिळत नसून विक्री केलेल्या मालाचे त्वरित पेमेंटही मिळत नसल्याची अनेक वर्षांपासून शेतकºयांची तक्रार असल्याने शासनाने इलेक्ट्रॉनिक बाजार तयार करून इंटरनेटद्वारे शेतकºयांसाठी बाजारपेठ निर्माण करून दिली आहे. यामध्ये शेतकरी व व्यापाºयांचे आधारकार्ड, बँक खाते, मोबाइल रजिस्टर करून बाजार समितीत आलेल्या मालाची गेट इंट्री करून मालाची गुणवत्ता तपासणी व लॉट क्रिएशन करून मालाची विक्री ई ओकशनद्वारे करत रिपोर्ट जनरेट केले जातात. खरेदीदार व्यापारी पोर्टलद्वारे बिल देत असल्याने पूर्णपणे गोपनीयता असल्याने स्पर्धात्मक परिस्थिती निर्माण होत असल्याने मालाला चांगला बाजारभाव मिळून शेतकºयांच्या खात्यावर त्वरित पेमेंट जमा होते. ई-नाम योजनेद्वारे शेतकºयांच्या मालाची विक्री करण्यासाठी कायदा पास केला आहे.
शेतकºयांनी उत्पादित केलेल्या मालाच्या विक्रीसाठी उपलब्ध असलेल्या पर्यांयापैकी केंद्र शासनाने विकसित केलेले ई-नाम पोर्टलद्वारे विक्री केल्यास शेतकºयांची फसवणूक न होता शेतमालाचे योग्य वजन व चांगला बाजारभाव मिळून त्वरित पेमेंट मिळण्याची खात्री असल्याने शेतकºयांनी मालाची विक्री ई-नामद्वारे करावी, असे आवाहन बाजार समिती सभापती शिवाजी चुंबळे, उपसभापती युवराज कोठुळे यांनी केले आहे.