नाशिक कुंभमेळा: 500 एकर जागेवर साधुग्राम, ९१ किमी रिंगरोड अन् प्लॅटफॉर्म वाढवणार; काय काय केले जाणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2025 21:00 IST2025-03-05T20:59:14+5:302025-03-05T21:00:28+5:30

Nashik kumbh mela preparation update: सिंहस्थ आढावा बैठक; प्लॅटफॉर्म वाढीसाठी आराखडा, सध्या ३७५ एकर जागा साधुग्रामसाठी आरक्षित

nashik kumbh mela preparation in marathi all details here | नाशिक कुंभमेळा: 500 एकर जागेवर साधुग्राम, ९१ किमी रिंगरोड अन् प्लॅटफॉर्म वाढवणार; काय काय केले जाणार?

नाशिक कुंभमेळा: 500 एकर जागेवर साधुग्राम, ९१ किमी रिंगरोड अन् प्लॅटफॉर्म वाढवणार; काय काय केले जाणार?

नााशिक: सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी पहिल्या टप्प्यात नांदुर मानुरपर्यंत ५०० एकर जागा आरक्षित करण्याचा निर्णय मंगळवारी (दि.४) झालेल्या सिंहस्थ आढावा बैठकीत घेण्यात आला. जागा भाड्याने घेतली जाईल. सध्या ३७५ एकर जागा साधुग्रामसाठी आरक्षित असून ९४ एकर जागा मनपाच्या ताब्यात आहे. मात्र हे क्षेत्र अतिषय कमी असून अजून किमान एक हजार हेक्टर जागा लागणार आहे. मात्र सुरवातीला ५०० जागा आरक्षित केली जाईल.

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

लाखो भाविक सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी नाशिक तसेच त्र्यंबकेश्वरला येणार असल्याने नाशिकरोड रेल्वे स्थानकावर प्लॅटफॉर्म वाढविता येईल का? याची चाचपणी करावी. रेल्वे स्थानकाच्या पाठीमागे नाशिक महानगरपालिकेची अकरा एकर जागा आहे त्याठिकाणीही रेल्वे प्लॅटफॉर्म बनविता येईल का? याबाबत आराखडा करण्याचे देखील बैठकीत ठरले. 

ओढा आणि देवळाली कॅम्प याठिकाणीही प्लॅटफॉर्म बनविण्याबाबत मंथन करावे, वुडशेड, मालधक्का आता आहे तेथून हलविण्याचा विचार करावा, अशा विविध सूचना विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम यांनी बैठकीत दिल्या. कुंभमेळ्यासाठी देशभरातून सोडण्यात येणाऱ्या किमान ६० टक्के विशेष रेल्वेला नाशिकरोड स्थानकावर थांबा देण्याऐवजी ओढा आणि देवळाली कॅम्प येथेच थांबा देता येईल का? याची पाहणी करण्यात येईल.

शहराभोवती ९१ किलोमीटरचा रिंगरोड

भाविकांना गोदाघाट, तपोवनात विनाअडथळा जाता यावे, यासाठी शहराच्या भोवती २१ किलोमीटरचा रिंगरोड तयार करून तो शहराच्या बाजूने फिरवावा. रिंगरोडला राष्ट्रीय महामार्ग जोडण्यात यावा. सर्व रस्ते रेल्वे स्टेशन, विमानतळांना तसेच समृद्धी महामार्गाला जोडण्यात यावे. समृद्धी महामार्गाला नगर-कोपरगाव, सिन्नर-गोंदे हे रस्ते जोडण्यात यावे, अशा सूचनाही यावेळी विभागीय आयुक्तांनी दिल्या.

घाट पाचपट मोठा करण्यावर विचार

गोदावरी काठावर केवळ पाच किलोमीटरच्या घाट तयार करून गर्दी नियंत्रित होऊ शकत नाही. त्यासाठी पाच पट अधिक घाट बनविण्याची गरज विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम यांनी व्यक्त केली. रोड बनविण्यासाठी अधिक वेळ लागणार आहे. तेव्हा एसटीपीचे टेंडर झाले की रोडचे टेंडर तयार करा, रस्त्याची कामे सुरू करा, अशा सूचनाही आयुक्तांनी दिल्या.

मुख्यमंत्र्यांची सूचना

साधुग्रामसाठी भाडेतत्त्वावर जागा घ्यावी, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत. मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार काम सुरू करण्याचे निर्देश यावेळी विभागीय आयुक्तांनी दिले.
 
नवीन प्लॅटफॉर्म ४० मीटरपेक्षा अधिक हवे

विभागीय आयुक्तांनी बैठकीत सांगितले की, रेल्वे स्थानकावर सध्या एकावेळी चार हजार प्रवासी उतरू शकतात.

सिंहस्थात येणाऱ्या भाविकांची संख्या लक्षात घेता नवीन प्लॅटफॉर्म बनविताना त्यांची रुंदी ४० मीटरपेक्षा अधिक असायला हवी जेणेकरून भाविकांना प्लॅटफॉर्मवर उतरण्यास जागा मिळू शकेल.

तपोवनात नदीच्या पलीकडे, 5 लक्ष्मी नारायण मंदिराच्या विरुद्ध बाजूला, दसक पंचकच्या समोरील बाजूस घाट बनविण्यावर विचार करण्यास आयुक्तांनी सुचविले. त्यानुसार यंदा घाटांची संख्या आणि रुंदी वाढणार आहे.

Web Title: nashik kumbh mela preparation in marathi all details here

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.