रुग्णसंख्येत नाशिकने मालेगावला टाकले मागे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2020 10:32 PM2020-06-11T22:32:48+5:302020-06-12T00:25:22+5:30

नाशिक : ग्रामीण भागात कोरोनाचा पहिला रुग्ण सापडल्यानंतर त्यानंतर कित्येक दिवस नाशिकला कोरोनाची बाधा न पोहोचल्याबद्दल समाधान व्यक्त करणाऱ्या नाशिककरांचा कोरोनाच्या वाढत्या संख्येने हृदयाचा ठोका चुकू लागला असून, राज्य सरकारने जाहीर केलेल्या हॉटस्पॉट मालेगावपेक्षाही नाशिक शहरात कोरोनाची संख्या झपाट्याने वाढून मालेगावलाही मागे टाकले आहे.

Nashik lags behind Malegaon in number of patients | रुग्णसंख्येत नाशिकने मालेगावला टाकले मागे

रुग्णसंख्येत नाशिकने मालेगावला टाकले मागे

Next

नाशिक : ग्रामीण भागात कोरोनाचा पहिला रुग्ण सापडल्यानंतर त्यानंतर कित्येक दिवस नाशिकला कोरोनाची बाधा न पोहोचल्याबद्दल समाधान व्यक्त करणाऱ्या नाशिककरांचा कोरोनाच्या वाढत्या संख्येने हृदयाचा ठोका चुकू लागला असून, राज्य सरकारने जाहीर केलेल्या हॉटस्पॉट मालेगावपेक्षाही नाशिक शहरात कोरोनाची संख्या झपाट्याने वाढून मालेगावलाही मागे टाकले आहे. विशेष म्हणजे लॉकडाऊनची शिथिलता व संचारबंदीतील सवलतीमुळे नाशिक शहरात दर सात दिवसांत रुग्णसंख्येत दुपटीने वाढ होत असल्याचे आढळून आले आहे.
जिल्ह्यात मार्च महिन्यापासून ते आजपावेतो १७०२ कोरोनाबाधित रुग्ण सापडले असून, त्यातील ११३० रुग्ण उपचाराअंति बरे झाले असून, १०५ जणांचा उपचार सुरू असताना मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. आजमितीला ४६७ जणांना कोरोनाने ग्रासले आहे. त्यातील १८३ रुग्ण विविध रुग्णालयात उपचार घेत असले तरी, गेल्या दहा दिवसांपूर्वी जिल्ह्यात सर्वाधिक कोरोनाच्या रुग्णांची संख्या मालेगाव शहरात होती. झोपडपट्टी, दाट लोकवस्ती व जनजागृतीच्या अभावामुळे कोरोनाने झपाट्याने मालेगावी आपले हातपाय पसरविल्याने राज्यात मालेगावच्या रुग्ण संख्या चिंता उत्पन्न करणारी ठरली होती. एकट्या मालेगावात ८५८ रुग्णांना कोरोनाने विळखा घातल्याची बाब आरोग्याच्या दृष्टीने गंभीर मानली गेली. त्यामानाने नाशिक शहर कोरोनापासून चार हात दूर ठेवून होते. एखाद दुसरा रुग्ण सापडल्यानंतर तातडीने त्याच्यावर व त्याच्याशी संपर्क आलेल्यांना रुग्णालयात भरती करून उपचार करण्यात आले. त्यात अचानक वाढ झाली आहे. मालेगावच्या रुग्णसंख्येत दोन आठवड्यांपासून कमालीची घसरण होत असताना दुसरीकडे नाशिक शहरात रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. आजवर एकूण ५१२ शहरवासीयांना कोरोनाने ग्रासले असले तरी, दररोज सापडणाºया कोरोनाबाधितांचे प्रमाण पाहता मालेगाव शहरापेक्षा ते अधिक असल्याचे आरोग्य विभागाचे म्हणणे आहे.
----------------------
९४ दिवसांनंतर रुग्णांची संख्या दुप्पट
मालेगाव शहरात गेल्या ३१ मे ते ८ जून या कालावधीत सापडलेल्या रुग्णांची संख्या पाहता, त्याचे प्रमाण ९४.२ इतके आहे. म्हणजे ९४ दिवसांनंतर कोरोना रुग्णांची संख्या दुप्पट होत असून, त्यामानाने नाशिक शहराचे हेच प्रमाण ७.२० इतके असून, सरासरी सात दिवसांनी शहरात कोरोनाच्या रुग्णांची संख्या दुप्पट होत आहे. नाशिक ग्रामीण भागात मात्र हेच प्रमाण साडेचौदा दिवस इतके आहे. सध्या मालेगाव शहरात ८२ रुग्ण उपचार घेत असून, नाशिक शहरात हीच संख्या २८४ इतकी आहे.

रुग्णसंख्येत नाशिकने
मालेगावला टाकले मागे

Web Title: Nashik lags behind Malegaon in number of patients

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक