Nashik: इसमावर हल्ला करण्याच्या नादात बिबट्या विहिरीत

By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2023 04:12 PM2023-07-16T16:12:17+5:302023-07-16T16:12:53+5:30

Nashik: सिन्नर तालुक्यातील पास्ते येथे आज रविवार ( दि.१६ ) दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास इसमावर हल्ला करण्याच्या नादात बिबट्या विहिरीत पडल्याची घटना घडली आहे.परिसरातील ग्रामस्थ बिबट्याला वाचविण्यासाठी प्रयत्न करत आहे.

Nashik: Leopards in the well in the wake of the attack on Isma | Nashik: इसमावर हल्ला करण्याच्या नादात बिबट्या विहिरीत

Nashik: इसमावर हल्ला करण्याच्या नादात बिबट्या विहिरीत

googlenewsNext

- दत्ता दिघोळे
नाशिक  - सिन्नर तालुक्यातील पास्ते येथे आज रविवार ( दि.१६ ) दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास इसमावर हल्ला करण्याच्या नादात बिबट्या विहिरीत पडल्याची घटना घडली आहे.परिसरातील ग्रामस्थ बिबट्याला वाचविण्यासाठी प्रयत्न करत आहे.

पास्ते येथिल राणूआईचा मळ्यात वसंत पुंजाजी आव्हाड हे त्यांच्या शेतातील विहीरीवर पाणी काढत असतांना बांधाच्या आडून दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्यांच्यावर हल्ला चढवणार तोच वसंत आव्हाड यांनी हातातील छत्री उघडून बचाव करण्याचा प्रयत्न केला.छत्री उघडताच बिबट्या घाबरल्याने पळ काढण्याच्या नादात शेजारील विहीरीत कोसळला.भयभीत झालेल्या वसंत आव्हाड यांनी  शेजारील शेतकऱ्यांना आवाज दिला.यावेळी प्रकाश श्रीरंग आव्हाड, गोरख देवराम आव्हाड, नामदेव भीमा आव्हाड, संतु कुंडलिक भगत, गणेश केशव घुगे,अनिल जगन आव्हाड, राजेंद्र विठोबा आव्हाड, दीपक डोली,संजय आव्हाड आदीनी आव्हाड यांना धीर दिला.

बिबट्या विहिरीत पडल्याची बातमी परिसरात पसरताच नागरिकांनी बिबट्या बघण्यासाठी गर्दी केली आहे.दरम्यान घडलेली घटना सामाजिक कार्यकर्ते गणेश घुगे यांनी सिन्नर वनविभागाला कळवली आहे. वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळावर येईपर्यंत शेतकऱ्यांनी पाण्यात पडलेल्या बिबट्याला वाचविण्यासाठी लाकडी बाज सोडली आहे.

शेतकऱ्यांवर हल्ला करण्याच्या नादात विहिरीत पडलेल्या बिबट्याने जिवाच्या आकंताने डरकाळ्या सुरू केल्या.पाणी जास्त असल्यामुळे बिबट्याने विद्युत मोटारीचा पाईप व मोटार तरंगण्यासाठी वापरलेल्या वाईरलुपचा आधार घेतला आहे.शेतकऱ्यांच्या निरीक्षणावरून मादी बिबट्या असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे.

Web Title: Nashik: Leopards in the well in the wake of the attack on Isma

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.