नाशिक दुसऱ्या टप्प्यात येण्याची शक्यता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2021 04:11 AM2021-06-11T04:11:13+5:302021-06-11T04:11:13+5:30
----------------- असे असेल दुसऱ्या टप्प्यातील अनलॉक दुसऱ्या टप्प्यात अत्यावश्यकसह इतर दुकाने नियमित वेळेत सुरू राहतील. रेस्टॉरंट, थिएटर क्षमतेच्या ५० ...
-----------------
असे असेल दुसऱ्या टप्प्यातील अनलॉक
दुसऱ्या टप्प्यात अत्यावश्यकसह इतर दुकाने नियमित वेळेत सुरू राहतील. रेस्टॉरंट, थिएटर क्षमतेच्या ५० टक्के सुरू राहतील. शॉपींग मॉल, सार्वजनिक उद्याने, मैदाने, जॉगींग ट्रॅक पूर्ण सुरू राहतील. लग्न समारंभात हॉलच्या ५० टक्के क्षमता वा शंभर माणसे उपस्थित राहतील. शासकीय व खासगी कार्यालयात शंभरटक्के उपस्थिती असू शकेल. बांधकाम पूर्ण सुरू, जीम, सलून, ब्युटी पार्लर, स्पा ५० टक्के क्षमतेने सुरू केले जातील. दुपारी चार वाजतानंतरची संचारबंदीत शिथिलता मिळू शकते.
चौकट====
रुग्णसंख्या व पॉझिटिव्हिटी दर
दि. ६ जून- ३२४ (४.८१ टक्के)
दि. ७ जून- २६३ (६.३२ टक्के)
दि. ८ जून- ३५६ (५.०४ टक्के)
दि. ९ जून- ३८३ (५.३३ टक्के)
------------
चौकट====
शहराचा टक्का घसरला
नाशिक शहरातील कोरोना बाधित रुग्णांची संख्याही झपाट्याने कमी होत चालली असून, पॉझिटिव्हिटीचा ग्राफही खाली उतरू लागला आहे. त्यात प्रामुख्याने गेल्या चार दिवसात बाधित रुग्णांची संख्या सरासरी १२५ इतकी असून, पॉझिटिव्हिटीचा दरही ३.५१ टक्क्यावर आला आहे.