नाशिक लोकल निवडणुकीनंतरच?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2019 01:31 AM2019-02-11T01:31:20+5:302019-02-11T01:31:35+5:30
फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात नाशिक-कल्याण लोकल सेवा सुरू होणार असल्याचे जाहीर करण्यात आल्यानंतर लोकलच्या प्रतीक्षेत असलेल्या नाशिकरांचा मात्र हिरमोड झाला आहे. नाशिक-कल्याण दरम्यान असलेल्या कसारा घाटातील चाचणीत अडचणी येत असल्यामुळे ही लोकल सेवा येत्या सहा महिन्यांत तरी शक्य नसल्याचा दावा मध्यरेल्वेच्या भुसावळ डिव्हिजनने केला आहे. विशेष म्हणजे लोकलची चाचणी घेण्यात आल्याबद्दलची कोणतीही अधिकृत माहिती भुसावळ डिव्हिजनकडेदेखील नसल्याने फेब्रुवारीत लोकल सुरू होण्याच्या घोषणेचे गूढ वाढले आहे. लोकल सुरू करण्याचा निर्णय हा निवडणुकीनंतरच होऊ शकतो, अशी चर्चा असताना काहीही करून महिनाभरात लोकल सुरू करण्याबाबत जोरदार प्रयत्न सुरू असल्याचेही बोलले जात आहे.
नाशिक : फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात नाशिक-कल्याण लोकल सेवा सुरू होणार असल्याचे जाहीर करण्यात आल्यानंतर लोकलच्या प्रतीक्षेत असलेल्या नाशिकरांचा मात्र हिरमोड झाला आहे. नाशिक-कल्याण दरम्यान असलेल्या कसारा घाटातील चाचणीत अडचणी येत असल्यामुळे ही लोकल सेवा येत्या सहा महिन्यांत तरी शक्य नसल्याचा दावा मध्यरेल्वेच्या भुसावळ डिव्हिजनने केला आहे. विशेष म्हणजे लोकलची चाचणी घेण्यात आल्याबद्दलची कोणतीही अधिकृत माहिती भुसावळ डिव्हिजनकडेदेखील नसल्याने फेब्रुवारीत लोकल सुरू होण्याच्या घोषणेचे गूढ वाढले आहे. लोकल सुरू करण्याचा निर्णय हा निवडणुकीनंतरच होऊ शकतो, अशी चर्चा असताना काहीही करून महिनाभरात लोकल सुरू करण्याबाबत जोरदार प्रयत्न सुरू असल्याचेही बोलले जात आहे.
नाशिक ते कल्याण दरम्यान फेब्रुवरीच्या दुसºया आवठड्यात लोकल सेवा सुरू होणार असल्याचे जाहीर करण्यात आले असले तरी नाशिकला इतक्यात लोकल मिळणे अशक्य असल्याचे समोर आले आहे. रेल्वेच्या तांत्रिक सल्लागारांनी कसारा घाटाची पाहणी केल्यानंतर घाटात लोकल अशक्य असल्याचे सांगून डेमो लोकल सुरू होऊ शकते असा पर्याय दिला होता. आता तर भुसावळ डिव्हिजनने इतक्या मोठ्या निर्णयाविषयी मात्र कानावर हात ठेवले आहेत. नाशिक- कल्याण दरम्यान घाट असल्यामुळे घाटात लोकल चालविणे अशक्य असल्याचे म्हटले आहे. कोणत्याही मार्गावर लोकल चालविण्याबाबतची चाचणी पूर्ण ही प्रदीर्घ प्रक्रिया आहे. त्यातच घाट सेक्शेन असल्यामुळे लोकलची चाचणी करणे हेच मोठे आव्हान असल्याने घाटातून लोकल चालविण्याबाबत कोणताही मोठा निर्णय तूर्तास नसल्याचे सूत्रांनी सांगितले.
दरम्यान, नाशिक-कल्याण दरम्यान लोकल सुरू करण्याचा मोठा गाजावाजा करण्यात आला असला तरी प्रत्यक्षात लोकल सुरू करण्याच्या तांत्रिक बाबींची पूर्तता आणि अहवालावरच सर्व काही अवलंबून असणार आहे. तसेच घाटात कुठेच लोकल चालविली जात नसल्यामुळे कसारा घाटातही
ते शक्य नसल्याचे यापूर्वीच
रेल्वेच्या तांत्रिक समितीने सांगितले आहे.
नाशिकच्या लोकल संदर्भात प्रत्यक्षात रेल्वे बोर्डाकडून काहीही जाहीर करण्यात आलेले नाही. नाशिक लोकल संदर्भातील हालचाली नक्कीच सुरू आहेत. परंतु याबाबत चर्चा कितीही असली तरी प्रत्यक्षात लोकल रुळावर येण्यासाठी बराच वेळ लागणार असल्याने एक-दोन महिन्यात नाही किमान वर्षभराची तरी नाशिककरांना प्रतीक्षा करावी लागणार आहे.