उद्धव ठाकरेंनी शब्द दिला अन् ऐनवेळी फिरवला; विजय करंजकरांनी भरला अपक्ष अर्ज
By संजय पाठक | Updated: May 3, 2024 13:55 IST2024-05-03T13:55:34+5:302024-05-03T13:55:56+5:30
समर्थकांशी बोलून पुढील निर्णय, करंजकरांची भूमिका, नाशिक आणि दिंडोरी लोकसभा मतदार संघात उमेदवारी दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस आहे

उद्धव ठाकरेंनी शब्द दिला अन् ऐनवेळी फिरवला; विजय करंजकरांनी भरला अपक्ष अर्ज
नाशिक- उध्दव सेनेने उमेदवारी देण्याचा वर्षभरापूर्वीच शब्द दिला आणि ऐनवेळा शब्द फिरवला असा आराेप करीत अखेरीस या पक्षाचे माजी
जिल्हा प्रमुख विजय करंजकर यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. येत्या दोन दिवसात यासंदर्भात समर्थकांचा मेळावा घेऊन मगच उमेदवारीबाबत घेऊ असे त्यांनी सांगितले.
नाशिक आणि दिंडोरी लोकसभा मतदार संघात उमेदवारी दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस आहे. त्यामुळे दोन दिवसांपूर्वी उमेदवारी अर्ज नेणाऱ्या करंजकर यांनी अर्ज दाखल केला आहे. आपल्याला वर्षभरापूर्वी उमेदवारी देण्याचे आश्वासन दिल्यानंतर आपण मतदार संघात चार फेऱ्या पूर्ण केल्या आहेत. आणि ऐनवेळी उमेदवारी कापली. त्यामुळे अखेरीस आपण उमेदवारीचा निर्णय घेतल्याचे ते म्हणाले.
आपल्याबरोबर शिवसेनेचे ३५ माजी नगरसेवक आणि चार जिल्हा परीषद सदस्य तसेच काही पदाधिकारी असल्याचेही ते म्हणाले तसेच शिवसेना प्रमुखांनी आपल्याला तीन वेळा मातोश्रीवर बोलवले. मात्र, मी खूप मोठा मोर्चा घेऊन मातोश्रीवर जाणार असल्याची चूकीची माहिती मातोश्रीला दिली गेली आणि त्यामुळे ऐनवेळी त्यांनी तीन्ही वेळेस भेट टाळली असेही करंजकर म्हणाले.