होय, आम्हाला समेार शिंदे सेनेचाच उमेदवार हवा; संजय राऊतांनी सांगितलं कारण...
By संजय पाठक | Published: April 29, 2024 11:58 AM2024-04-29T11:58:26+5:302024-04-29T11:59:05+5:30
नसीम खान यांना शिवसेनेने कधीही विरोध केलेला नाही, असे असताना त्यांची या प्रकरणात दिशाभूल करण्यात आली असावी असं संजय राऊतांनी सांगितले.
नाशिक- लोकसभा निवडणूकीत आम्हाला समोर शिंदे सेनेचेच उमेदवार हवे आहेत कारण समोर लाढून त्यांना पराभूत करायचं आहे, असे मत शिवसेनेच्या उध्दव सेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केलेे आहे. नाशिकमध्ये माध्यमांशी बेालताना त्यांनी हे मत व्यक्त केलं. उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदार संघात शिवसेनेच्या विरोधामुळे नसीम खान यांच्या ऐवजी वर्षा गायकवाड यांना उमेदवारी द्यावी लागली हा मुद्दा त्यांनी खेाडून काढला आणि शिवसेनेने कधीच नसीम खान यांना विरोध केलेला नाही. त्यांना गरज वाटली तर त्यांनी आत्ताही उमेदवार बदलावा असे राऊत म्हणाले.
नाशिक आणि दिंडोरी लोकसभा मतदार संघातील उमेदवारांचा अर्ज दाखल करण्यासाठी खासदार राऊत नाशिकमध्ये असून पत्रकारांशी बेालताना त्यांनी नाशिक काय पण कुठेही उध्दव सेनेच्या विरोधात शिंदे सेेनेचेच उमेदवार हवेत, कारण त्यांना पाडण्यासाठी शिवसैनिक उत्सूक आहेत, असे राऊत म्हणाले. उत्तर मध्य मतदार संघाची जागा काँग्रेस पक्षाला गेली आहे. त्यामुळे तेथे कोणाला उमेदवारी द्यायची हा त्यांचा विषय आहे. नसीम खान यांना शिवसेनेने कधीही विरोध केलेला नाही, असे असताना त्यांची या प्रकरणात दिशाभूल करण्यात आली असावी, त्यामुळे अजूनही वेळ गेलेली नाही त्यांना वाटत असेल तो उमेदवार कॉंग्रेसने द्यावा असे ते म्हणाले.