नाशिक लोकसभा निवडणूक निकाल 2019: आठव्या फेरीनंतरही गोडसे आघाडीवर ८७ हजाराने भुजबळ पिछाडीवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2019 04:20 PM2019-05-23T16:20:17+5:302019-05-23T16:20:43+5:30
नाशिकमध्ये नवव्या फेरीअखेर गोडसे यांनी एकूण २ लाख १३ हजार २३५ मते मिळविली असून भुजबळांना मागे टाकले आहे. फेरीनंतर गोडसे यांनी ८७ हजार २१९ मतांनी आघाडी घेतली आहे. भुजबळ यांच्या पारड्यात १लाख २६ हजार १६ मते पडली
नाशिक : प्रत्येक लोकसभा निवडणुकीत परिवर्तन घडविणाऱ्या नाशिक लोकसभा मतदारसंघात यंदा शिवसेनेचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे व राष्ट्रवादीचे माजी खासदार समीर भुजबळ यांच्यातच खरी लढत आहे. अपवाद वगळता या मतदारसंघात एकदा निवडून दिलेला खासदार पुन्हा निवडून येत नाही. गेल्या निवडणुकीत छगन भुजबळ यांचा पराभव करून हेमंत गोडसे हे मोदी लाटेवर विराजमान झाले होते. त्यामुळे गोडसे यंदा विक्र म करतात की समीर भुजबळ, याकडे साऱ्यांचेच लक्ष लागले आहे; मात्र मतमोजणीच्या चार फेºयाअखेर गोडसे यांनी घेतलेली आघाडी कायम आहे. त्यामुळे गोडसे विक्रम करणार असल्याची चर्चा शहरात सुरू झाली आहे.
लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरु वात झाली असून नाशिकमध्ये नवव्या फेरीअखेर गोडसे यांनी एकूण २ लाख १३ हजार २३५ मते मिळविली असून भुजबळांना मागे टाकले आहे. फेरीनंतर गोडसे यांनी ८७ हजार २१९ मतांनी आघाडी घेतली आहे. भुजबळ यांच्या पारड्यात १लाख २६ हजार १६ मते पडली आहेत.
नाशिक लोकसभा मतदारसंघात एकूण अठरा लाखांहून अधिक मतदार असून, यंदाच्या निवडणुकीत ५९ टक्के मतदान झालंय. गेल्या निवडणुकीत हेमंत गोडसे यांना ४ लाख ९४ हजार ७३५ मतं मिळाली होती, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार छगन भुजबळ यांना ३ लाख ७ हजार ३९९ मतं मिळाली होती.