नाशिक लोकसभा निवडणूक निकाल 2019: गोडसे यांनी अडीच लाख मतांनी भुजबळांना टाकले मागे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2019 10:23 PM2019-05-23T22:23:41+5:302019-05-23T22:24:38+5:30
२०व्या फेरीअखेर गोडसे यांनी एकूण ४ लाख ९४ हजार १०१ मते मिळविली असून भुजबळांना मागे टाकले आहे. भुजबळ यांच्या पारड्यात २ लाख ४२ हजार ७८७ मते पडली आहेत.
नाशिक : प्रत्येक लोकसभा निवडणुकीत परिवर्तन घडविणाऱ्या नाशिक लोकसभा मतदारसंघात यंदा शिवसेनेचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे व राष्ट्रवादीचे माजी खासदार समीर भुजबळ यांच्यातच खरी लढत आहे. अपवाद वगळता या मतदारसंघात एकदा निवडून दिलेला खासदार पुन्हा निवडून येत नाही. गेल्या निवडणुकीत छगन भुजबळ यांचा पराभव करून हेमंत गोडसे हे मोदी लाटेवर विराजमान झाले होते. त्यामुळे गोडसे यंदा विक्र म करतात की समीर भुजबळ, याकडे साऱ्यांचेच लक्ष लागले होते; मात्र मतमोजणीच्या २०फे-या पुर्ण झाल्या आहेत. निकालाची आकडेवारी बघता गोडसे यांनी विक्रम केला असून प्रचंड मताधिक्याने आघाडी घेत भुजबळ यांना तब्बल २ लाख ५१ हजार ३१४ मतांनी मागे टाकले आहे. गोडसे यांनी विजयाचा जल्लोष साजरा क रण्यास सुरूवात केली असून शिवसेना मध्यवर्ती कार्यालयापुढे कार्यकर्त्यांकडून गुलालाची उधळण करण्यात आली.
लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणी अखेरच्या टप्प्यांत पोहचली असून नाशिकमध्ये २०व्या फेरीअखेर गोडसे यांनी एकूण ४ लाख ९४ हजार १०१ मते मिळविली असून भुजबळांना मागे टाकले आहे. भुजबळ यांच्या पारड्यात २ लाख ४२ हजार ७८७ मते पडली आहेत.
नाशिक लोकसभा मतदारसंघात एकूण अठरा लाखांहून अधिक मतदार असून, यंदाच्या निवडणुकीत ५९ टक्के मतदान झालंय. गेल्या निवडणुकीत हेमंत गोडसे यांना ४ लाख ९४ हजार ७३५ मतं मिळाली होती, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार छगन भुजबळ यांना ३ लाख ७ हजार ३९९ मतं मिळाली होती.