नाशिक लोकसभा निवडणूक निकाल 2019: हेमंत गोडसे यांचा २ लाख ९२ हजाराने दणदणीत विजय; भुजबळ यांचा दारूण पराभव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2019 12:53 AM2019-05-24T00:53:54+5:302019-05-24T01:02:17+5:30

मतमोजणीच्या २७ फे-या पुर्ण झाल्या आहेत. निकालाची आकडेवारी बघता गोडसे यांनी विक्रम केला असून प्रचंड मताधिक्याने आघाडी घेत भुजबळ यांना तब्बल २ लाख ९२ हजार २०४ मतांनी मागे टाकले आहे.

Nashik Lok Sabha election results 2019: Hemant Godse's victory in 2 lakh 91 thousand; Bhujbal's heavy defeat | नाशिक लोकसभा निवडणूक निकाल 2019: हेमंत गोडसे यांचा २ लाख ९२ हजाराने दणदणीत विजय; भुजबळ यांचा दारूण पराभव

नाशिक लोकसभा निवडणूक निकाल 2019: हेमंत गोडसे यांचा २ लाख ९२ हजाराने दणदणीत विजय; भुजबळ यांचा दारूण पराभव

Next
ठळक मुद्देनाशिकमध्ये दुस-यांदा खासदार रिपिट होण्याचा विक्रम झाला दाच्या निवडणुकीत ५९ टक्के मतदान झालंय. मागील लोकसभेत गोडसे यांनी भुजबळ यांचा १ लाख ८७ हजार ३३६ मतांनी पराभव केला होता.

नाशिक : प्रत्येक लोकसभा निवडणुकीत परिवर्तन घडविणाऱ्या नाशिक लोकसभा मतदारसंघात यंदा शिवसेनेचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे व राष्ट्रवादीचे माजी खासदार समीर भुजबळ यांच्यातच खरी लढत आहे. अपवाद वगळता या मतदारसंघात एकदा निवडून दिलेला खासदार पुन्हा निवडून येत नाही. गेल्या निवडणुकीत छगन भुजबळ यांचा पराभव करून हेमंत गोडसे हे मोदी लाटेवर विराजमान झाले होते. त्यामुळे गोडसे यंदा विक्र म करतात की समीर भुजबळ, याकडे साऱ्यांचेच लक्ष लागले होते; मात्र मतमोजणीच्या २७ फे-या पुर्ण झाल्या आहेत. निकालाची आकडेवारी बघता गोडसे यांनी विक्रम केला असून प्रचंड मताधिक्याने आघाडी घेत भुजबळ यांना तब्बल २ लाख ९२ हजार २०४ मतांनी मागे टाकले आहे. गोडसे यांनी विजयाचा जल्लोष साजरा क रण्यास सुरूवात केली असून शिवसेना मध्यवर्ती कार्यालयापुढे कार्यकर्त्यांकडून गुलालाची उधळण करण्यात आली.
लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणी अखेरच्या टप्प्यांत सुरू असून नाशिकमध्ये २७व्या फेरीअखेर गोडसे यांनी एकूण ५ लाख ६३ हजार ५९९ मते मिळविली असून भुजबळांना मागे टाकले आहे. भुजबळ यांच्या पारड्यात २ लाख ७१ हजार ३९५ मते पडली आहेत. गोडसे यांच्या रूपाने नाशिकमध्ये दुस-यांदा खासदार रिपिट होण्याचा विक्रम झाला आहे.
नाशिक लोकसभा मतदारसंघात एकूण अठरा लाखांहून अधिक मतदार असून, यंदाच्या निवडणुकीत ५९ टक्के मतदान झालंय. गेल्या निवडणुकीत हेमंत गोडसे यांना ४ लाख ९४ हजार ७३५ मतं मिळाली होती, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार छगन भुजबळ यांना ३ लाख ७ हजार ३९९ मतं मिळाली होती. या निवडणूकीत मागील मतांच्या तुलनेत गोडसे यांनी ६७ हजार २९९ मते अधिक मिळविली आहे. तसेच समीर भुजबळ यांचा २ लाख ९२ हजार २०४ मतांनी दणदणीत पराभव केला आहे. मागील लोकसभेत गोडसे यांनी भुजबळ यांचा १ लाख ८७ हजार ३३६ मतांनी पराभव केला होता.

Web Title: Nashik Lok Sabha election results 2019: Hemant Godse's victory in 2 lakh 91 thousand; Bhujbal's heavy defeat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.