नाशिकच्या बाजारात लालचुटुक स्ट्रॉबेरीची आवक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2018 11:44 AM2018-01-17T11:44:26+5:302018-01-17T11:46:14+5:30

लाल, गुलाबी रंगाची, गोड, आंबट चवीची स्ट्रॉबेरी म्हटल्यावर कुणाच्याही तोंडाला पाणी सुटेल. अशा स्ट्रॉबेरीचा हंगाम वाढत्या थंडीबरोबरच बहरला असून, लालचुटूक आरोग्यदायी स्ट्रॉबेरी नााशिक शहरासह परिसरातील रस्त्यांवर आणि पर्यटनस्थळांवर ठिकठिकाणी विक्र ीसाठी उपलब्ध झाली आहे.

In the Nashik market, the arrival of strawberries | नाशिकच्या बाजारात लालचुटुक स्ट्रॉबेरीची आवक

नाशिकच्या बाजारात लालचुटुक स्ट्रॉबेरीची आवक

Next
ठळक मुद्देगोड, आंबट चवीची भूरळआडगावसह कळवण, सुरगाणा परिसरात उत्पादन


नाशिक : लाल, गुलाबी रंगाची, गोड, आंबट चवीची स्ट्रॉबेरी म्हटल्यावर कुणाच्याही तोंडाला पाणी सुटेल. अशा स्ट्रॉबेरीचा हंगाम वाढत्या थंडीबरोबरच बहरला असून, लालचुटूक आरोग्यदायी स्ट्रॉबेरी नााशिक शहरासह परिसरातील रस्त्यांवर आणि पर्यटनस्थळांवर ठिकठिकाणी विक्र ीसाठी उपलब्ध झाली आहे. जगभरातील स्ट्रॉबेरी उत्पादनात अग्रेसर असलेल्या महाबळेश्वर बरोबरच नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा, कळवण तालुक्यांतील घाटमाथ्यावर लालमातीत पिकणारी लालभडक, लहान-मोठी, आंबटगोड अशी स्ट्रॉबेरीची फळे नाशिक शहरासह परिसरातील बाजार पेठेत मोठ्या प्रमाणात आवक वाढली असून, नाशिकच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत रोज दोन ते अडीच टन स्ट्रॉबेरी विक्र ीसाठी दाखल होत आहे.
सुरगाणा तालुक्यातील प्रामुख्याने घाटमाथ्यावरील नागशेवडी, घोडांबे, पोहाळी, सराड, चिखली, शिंदे, हतगड, बोरगाव, घागबारी, लिंगामा आदी भागात, तर कळवण तालुक्याच्या पश्चिम भागातील पळसदरचे खोरे, सुकापूर, देवळी कराड, खेकुडे, बोरदैवत, वडापाडा आदी गावांतील शेतकरी पारंपरिक पिकांसह शास्त्रशुद्ध पद्धतीने स्ट्रॉबेरीची बाग लावत आहे. या भागात स्ट्रॉबेरीच्या पिकासाठी आवश्यक असलेले पोषक वातावरण, जमिनीची पोत यामुळे याभागात गेल्या दशकभरापासून स्ट्रॉबेरी लागवडीचे प्रयोग यशस्वी होऊ लागल्याने या भागात दिवसेंदिवस स्ट्रॉबेरीच्या लागवडीचे क्षेत्र वाढतच आहे. त्यामुळे या परिसरात स्ट्रॉबेरीचे उत्पन्न मोठ्या प्रमाणावर होऊ लागले आहे.

Web Title: In the Nashik market, the arrival of strawberries

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.