नाशिक बाजार समिती सुरू राहणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2021 04:15 AM2021-05-14T04:15:33+5:302021-05-14T04:15:33+5:30
नाशिक जिल्ह्यात बाजार समितीत दैनंदिन विविध प्रकारचा शेतमाल विक्रीसाठी येतो. नाशिक बाजार समितीत पालेभाज्या, फळभाज्या, कांदा, लसूण, बटाटा, डाळिंब, ...
नाशिक जिल्ह्यात बाजार समितीत दैनंदिन विविध प्रकारचा शेतमाल विक्रीसाठी येतो. नाशिक बाजार समितीत पालेभाज्या, फळभाज्या, कांदा, लसूण, बटाटा, डाळिंब, आंबा विक्रीला येतो.
बाजार समितीत रोज कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत असते. दोन दिवसापूर्वी जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी नाशिकमध्ये लॉकडाऊन केले. यात बाजार समिती बंद ठेवण्याचे आदेश दिले होते. बाजार समिती बंदमुळे शेतमाल नाशवंत होण्याची शक्यता असल्याने त्याची विल्हेवाट लावायची कशी, असे संकट शेतकऱ्यांसमोर उभे होते. यातून मार्ग काढण्यासाठी सभापती पिंगळे यांनी पालकमंत्री भुजबळ, जिल्हाधिकारी व जिल्हा उपनिबंधक यांच्याशी चर्चा करून शेतकऱ्यांच्या नुकसानीबाबत माहिती देत शासकीय नियमांचे पालन करीत बाजार समिती सुरू करण्याबाबत कल्पना दिली. त्यानुसार शुक्रवारपासून बाजार समिती सुरू राहणार आहे.