नाशिकच्या बाजारपेठेत पालेभाज्यांच्या भावात वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2018 12:18 PM2018-12-22T12:18:57+5:302018-12-22T12:19:31+5:30

भाजीपाला : आवक कमी झाल्याने पालेभाज्यांचे भाव वाढले आहेत.

In the Nashik market, there is an increase in the prices of vegetables | नाशिकच्या बाजारपेठेत पालेभाज्यांच्या भावात वाढ

नाशिकच्या बाजारपेठेत पालेभाज्यांच्या भावात वाढ

Next

नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत आवक कमी झाल्याने पालेभाज्यांचे भाव वाढले आहेत. टोमॅटोची ४५० ते १३५० रुपये क्ंिवटलने विक्री सुरू आहे. कोथिंबीर १०० जुडीचा भाव २४०० ते ५२०० रुपयांपर्यंत आहे. मेथी १०० जुडींचा भाव ८५० ते १८०० रुपयांपर्यंत होता.

शेपूची आवक घटली असून, १०० जुड्यांचा भाव ९०० ते २००० रुपयांपर्यंत होता. डाळिंब ४५० ते ३००० रुपये क्ंिवटलप्रमाणे विक्री सुरू होती. लाल कांद्याला कमीत कमी २०१ रुपये, जास्तीत जास्त ८६५ रुपये भाव मिळाला. परिणामी मागणी व पुरवठ्याचे प्रमाण व्यस्त झाल्याने गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत उन्हाळी कांद्याच्या बाजारभावात नीचांकी नोंद झाली. मक्याला चांगला दर मिळाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. सिन्नर बाजार समितीच्या वडांगळी उपबाजारात बुधवारी मक्याला १ हजार ७१० रुपये क्विंटल भाव मिळाला. यंदाच्या हंगामातील हा सर्वाधिक दर ठरला.

Web Title: In the Nashik market, there is an increase in the prices of vegetables

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.