नाशिकमध्ये महापालिकेच्या सभागृहात नगरसेवकांचेरात्रीपासून उपोषण सुरूच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2019 01:27 PM2019-06-26T13:27:31+5:302019-06-26T13:30:59+5:30
नाशिक - नाशिक शहरातील बेकादा धार्मिक स्थळे हटवू नये तसेच अन्य मागण्यांसाठी महापालिकेतील सत्तारूढ भाजपाचे सभागृह नेते दिनकर पाटील यांनीच महापालिकेच्या महासभेत मंगळवारी (दि.२५) पासून सुरू केलेले ठिय्या आंदोलन बुधवारी देखील सुरूच आहे. पाटील यांना विरोधकांनी देखील साथ दिली असून त्यामुळे आंदोलन नक्की कोणाचे आणि कोणाच्या विरोधात हेच पालिका वर्तुळाला संभ्रमात टाकणारे ठरले आहे. भाजपाने आता नामुष्की टाळण्यासाठी पालकमंत्री गिरीश महाजन यांना याप्रकाराबाबत मध्यस्थी करण्यासाठी साकडे घातले आहे.
नाशिक -नाशिक शहरातील बेकादा धार्मिक स्थळे हटवू नये तसेच अन्य मागण्यांसाठी महापालिकेतील सत्तारूढ भाजपाचे सभागृह नेते दिनकर पाटील यांनीच महापालिकेच्या महासभेत मंगळवारी (दि.२५) पासून सुरू केलेले ठिय्या आंदोलन बुधवारी देखील सुरूच आहे. पाटील यांना विरोधकांनी देखील साथ दिली असून त्यामुळे आंदोलन नक्की कोणाचे आणि कोणाच्या विरोधात हेच पालिका वर्तुळाला संभ्रमात टाकणारे ठरले आहे. भाजपाने आता नामुष्की टाळण्यासाठी पालकमंत्री गिरीश महाजन यांना याप्रकाराबाबत मध्यस्थी करण्यासाठी साकडे घातले आहे.
महापालिकेची महासभा मंगळवारी (दि.२५) महासभा पार पडली. यावेळी शहरातील बेकायदा ठरविण्यात आलेल्या धार्मिक स्थळांना पाडू नये, सेंट्रल किचन योजना रद्द करून बचत गटांनाच हे काम द्यावे, सिडकोतील स्वतंत्र बांधकाम नियंत्रण नियमावली कायम ठेवावे आणि महापालिकेच्या सील केलेल्या मिळकती त्वरीत खुल्या कराव्यात या मागणीसाठी रात्री पाटील यांनी अचानक महापौरांच्या पिठासनाच्या पुढ्यात बसून आंदोलन सुरू केले. त्यांना राष्टÑवादी कॉँग्रेसचे गटनेते गजानन शेलार, मनसेचे माजी गटनेते सलीम शेख पाटील यांच्या प्रभागातून निवडून आलेले रविंद्र धिवरे यांनी साथ दिली. काही काळ वर्षा भालेराव यांनी देखील आंदोलन केले.
सभागृहात रात्रीपासून सुरू असलेले उपोषण दुसऱ्या दिवशी सुरूच आहे. या बाबत महापौर रंजना भानसी व अन्य भाजपा नेते आज मधस्थी करू शकतात पण याला यश मिळेल का नाही हे आता स्पष्ट होत नाही.दुसरी कडे या उपोषणाला काही धार्मिक संघटना एकत्र होऊन पाठिंबा देणार आहे.
यावर प्रतिक्रि या देताना गजानन शेलार यांनी सांगितले की हे उपोषण समाज हिताच्या दृष्टीने सुरू केले आहे.पण महापौर रंजना भानसी यांना आपली दंडेलशाही वापरून नाशिक शहराचे भले करावयाचे नाही हे एकुण कृती वरून दिसत आहे, असे सांगितले.