Nashik: इंस्टाग्राम, स्नॅपचॅटवर मैत्री करून अल्पवयीन मुली विनयभंग, दोघांवर पोक्सोंतर्गत गुन्हा दाखल

By नामदेव भोर | Published: May 12, 2023 04:20 PM2023-05-12T16:20:18+5:302023-05-12T16:20:45+5:30

Crime News: एका अल्पवयीन मुलीसोबत सोशल मिडियाच्या माध्यमातून मैत्री करून तिचे न्यूड फोटो वायरल करण्याची धमकी देत पैशांची व शरीरसुखाची मागणी करणाऱ्या दोघा संशयितावर सरकारवाडा पोलिस ठाण्यात बालकांवरील लैंगिक अत्याचार संरक्षण कायद्या ( पोक्सो) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Nashik: Minor girls molested by friendship on Instagram, Snapchat, two booked under POCSO | Nashik: इंस्टाग्राम, स्नॅपचॅटवर मैत्री करून अल्पवयीन मुली विनयभंग, दोघांवर पोक्सोंतर्गत गुन्हा दाखल

Nashik: इंस्टाग्राम, स्नॅपचॅटवर मैत्री करून अल्पवयीन मुली विनयभंग, दोघांवर पोक्सोंतर्गत गुन्हा दाखल

googlenewsNext

- नामदेव भोर 

 नाशिक : एका अल्पवयीन मुलीसोबत इस्टाग्राम व स्नॅपचॅटसारख्या सोशल मिडियाच्या माध्यमातून मैत्री करून तिचे न्यूड फोटो सोशल मिडियावर वायरल करण्याची धमकी देत पैशांची व शरीरसुखाची मागणी करणाऱ्या दोघा संशयितावर सरकारवाडा पोलिस ठाण्यात बालकांवरील लैंगिक अत्याचार संरक्षण कायद्या ( पोक्सो) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिडितेने दिलेल्या फिर्यादीनुसार संशयित अथर्व शहाणे (२२, रा. औरंगाबाद) व सुहास जितेंद्र सराफ (२५, रा.लक्ष्मीनारायण निवास, सरस्वतीनगर, पंचक जेलरोड) यांनी पिडितेसोबत इंस्टाग्राम व स्नॅपचॅट यासारख्या सोशल माध्यमातून संपर्क साधून तिच्याशी मैत्री करीत पिडितेला अशोकस्तंभ परिसरात बोलवून जवळीक साधत तिच्याकडे न्यूड फोटोची मागणी केली. त्यानंतर ते फोटो सोशल मिडियावर वायरल करण्याची धमकी देत तिच्याकडे पैशाची व शरीर सुखाची मागणी केली. त्यामुळे पिडितेने दोन्ही संशयितांविरोधात सरकारवाडा पोलिस ठाण्याच फिर्याद दिली असून त्यानुसार पोलिसांनी संशयितांविरोधात पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात पोलिस निरीक्षक प्रविण चव्हाण अधिक तपास करीत आहेत.

Web Title: Nashik: Minor girls molested by friendship on Instagram, Snapchat, two booked under POCSO

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.