नाशिकच्या खासदाराचा आज फैसला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2019 01:03 AM2019-05-23T01:03:47+5:302019-05-23T01:04:10+5:30

नाशिक लोकसभा मतदारसंघात अठरा उमेदवार रिंगणात असले तरी, अखेरच्या क्षणापर्यंत चुरशीच्या झालेल्या तिरंगी लढतीकडे साऱ्यांचेच लक्ष लागून आहे. या निवडणुकीत शिवसेनेचे खासदार हेमंत गोडसे पुन्हा निवडून येऊन विक्रम करतात की, माजी खासदार समीर भुजबळ हे मतदारसंघ खेचून आणतात, याबरोबरच अपक्ष माणिकराव कोकाटे यांच्या उमेदवारीचा फटका व फायदा कोणाला होतो यावरच विजयाचे गणित आहे.

 Nashik MP's decision today | नाशिकच्या खासदाराचा आज फैसला

नाशिकच्या खासदाराचा आज फैसला

googlenewsNext

नाशिक : नाशिक लोकसभा मतदारसंघात अठरा उमेदवार रिंगणात असले तरी, अखेरच्या क्षणापर्यंत चुरशीच्या झालेल्या तिरंगी लढतीकडे साऱ्यांचेच लक्ष लागून आहे. या निवडणुकीत शिवसेनेचे खासदार हेमंत गोडसे पुन्हा निवडून येऊन विक्रम करतात की, माजी खासदार समीर भुजबळ हे मतदारसंघ खेचून आणतात, याबरोबरच अपक्ष माणिकराव कोकाटे यांच्या उमेदवारीचा फटका व फायदा कोणाला होतो यावरच विजयाचे गणित आहे.
या निवडणुकीत कोणीही उमेदवार निवडून आला तरी वेगळा विक्रम नोंदविला जाणार आहे.
नाशिक लोकसभा मतदारसंघात २९ एप्रिल रोजी १९०७ मतदान केंद्रांवर ५९.४३ टक्के मतदान झाले होते. १८ लाख ८२ हजार १११ मतदारांपैकी ११ लाख १८ हजार ५२० मतदारांनी आपला हक्क बजावला. त्यात ६ लाख १५ हजार ६६५ पुरुष, तर ५ लाख २ हजार ८५० महिला मतदारांचा समावेश आहे. गुरुवारी (दि. २३) अंबडच्या सेंट्रल वेअर हाउसमध्ये सकाळी आठ वाजता कडेकोट बंदोबस्तात मतमोजणी करण्यात येणार आहे.
सायंकाळपर्यंत मतदारांचा कौल कळणार असला तरी, यंदाच्या निवडणुकीत माजी आमदार माणिकराव कोकाटे यांची अपक्ष उमेदवारी व बहुजन वंचित आघाडीने पवन पवार यांना दिलेल्या उमेदवारीमुळे सत्ताधारी व विरोधी पक्षांचे निवडणुकीचे गणित बदलून टाकले आहे. त्यामुळे सर्वच उमेदवार विजयाचा दावा करीत असले तरी, खात्री कोणीच देत नाही, हे या निवडणुकीचे वैशिष्ट्य आहे. या मतदारसंघाचा पूर्वेतिहास पाहता, निवडणुकीत प्रमुख तीन उमेदवारांपैकी जो कोणी बाजी मारेल तो त्या उमेदवाराचा विक्रम असेल.
या उमेदवारांच्या निकालाकडे साऱ्यांचे लक्ष
हेमंत गोडसे । शिवसेना : दोन वेळा लोकसभेची निवडणूक लढवून एकदा विजयी झाालेले हेमंत गोडसे तिसºयांदा शिवसेनेकडून रिंगणात उतरले आहेत. जिल्हा परिषद सदस्य, नगरसेवकपदावरून थेट संसद गाठणाºया गोडसे यांना सेनेने पुन्हा उमेदवारी दिल्यामुळे पक्षांतर्गत काहीशी नाराजी होती. परंतु त्यावर मात करून गोडसे यांनी गेल्या पाच वर्षांतील कामगिरीवर मतदारांसमोर गेले. केंद्रात पुन्हा मोदी सरकार सत्तेवर आणण्यासाठी भाजपानेही त्यांच्या विजयासाठी प्रयत्न केले.
समीर भुजबळ । राष्टवादी : २००९ मध्ये पहिल्यांदाच खासदार झालेले समीर भुजबळ यांची पुन्हा दुसºयांदा गोडसे यांच्याविरोधात लढत होत आहे. खासदारकीच्या काळात केलेली कामे व गेल्या पाच वर्षांत रखडलेला विकास तसेच केंद्र सरकारच्या नोटबंदी, जीएसटी, महागाईच्या मुद्द्यावर भुजबळ निवडणुकीला सामोरे गेले. कॉँग्रेस, रिपाइं, स्वाभिमानी शेतकरी संघटनेने त्यांना पाठिंबा दिला आहे.
माणिकराव कोकाटे । अपक्ष : सिन्नर विधानसभा मतदारसंघाचे तीन वेळा आमदार राहिलेले माणिकराव कोकाटे भाजपाकडून लोकसभेसाठी इच्छुक होते. परंतु युती झाल्यामुळे त्यांनी बंडखोरी करीत हेमंग गोडसे यांना अडचणीत आणले. जिल्हा बॅँकेचे संचालक व आमदारकीच्या काळात केलेल्या कामाच्या बळावर ते निवडणुकीला सामोरे गेले आहेत. त्यांची उमेदवारी सत्ताधारी व विरोधकांना अडचणीची ठरली.
अगोदर होणार पोस्टल
मतपत्रिकांची मोजणी
सकाळी आठ वाजता मतमोजणीला सुरुवात होणार असली तरी, सर्वात प्रथम पोस्टल मतदानाची मोजणी होईल. त्यासाठी प्रत्येक मतदारसंघात चार टेबल लावण्यात आले आहेत. पोस्टल मतमोजणी सुरुवात झाल्यानंतर अर्ध्या तासात आयोगाच्या परवानगीनुसार ईव्हीएममधील मतमोजणी केली जाईल. प्रत्येक टेबलची फेरी पूर्ण झाल्याशिवाय नवीन फेरी होणार नाही.

Web Title:  Nashik MP's decision today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.