अनधिकृत बॅनरबाजीवर मनपाचा हातोडा; १५ ते २० फलकांवर कारवाई
By Suyog.joshi | Published: November 2, 2023 11:15 AM2023-11-02T11:15:03+5:302023-11-02T11:16:02+5:30
शहराच्या मुख्य भागात महापालिकेची परवानगी न घेता लावण्यात येणाऱ्या फलकबाजांना दणका बसला आहे.
नाशिक (सुयोग जोशी) : शहरातील अनधिकृत फलकांवर महापालिकेने कारवाईचा बडगा उगारला असून दिशादर्शक फलकांजवळील सुमारे १५ ते २० बॅनर, फलके काढण्यात आली आहेत. त्यामुळे शहराच्या मुख्य भागात महापालिकेची परवानगी न घेता लावण्यात येणाऱ्या फलकबाजांना दणका बसला आहे.
सणासुदीचा हंगाम सुरु झाला असून आतापासून शहरात अनधिकृत होर्डिंग्ज मोठ्या दिमाखात झळकत आहे. त्यासाठी महापालिकेची कोणतीही पूर्वपरवानगी घेतली जात नाही. विशेषत: शहरातील सहाही विभागात अवैधरित्या लावलेले फकल, बॅनर झळकत असून त्यामुळे मनपाचा जाहिरात फलकातून मिळणाऱ्या फलकावर पाणी सोडावे लागते. मात्र यापुढे अनधिकृत होर्डिंग्ज आढळून आल्यास संबंधितांवर थेट गुन्हे दाखल करण्याचे आदेश मनपा आयुक्त यांनी दिले आहेत. ज्या विभागाच्या मालमत्तेवर होर्डींग्ज असेल त्या सबंधितावर कारवाई करुन गुन्हे दाखल करावे असे स्पष्ट आदेशच त्यांनी जारी केले आहेत. याबाबतचा साप्ताहिक अहवाल आयुक्तांना सादर करणे बंधनकारक ठरणार आहे. अनधिकृत होर्डिंग्ज प्रकरणी आतापर्यंत फक्त होर्डिंग्ज जप्त केले जायचे. आयुक्तांनी ज्या विभागाच्या जागेवर अथवा मालमत्तेवर अनधिकृत होर्डिंग्ज असतील त्यांनी सबंधितावर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले असून त्याची तात्काळ अंमलबजावणी झाली पाहिजे असे आदेश जारी केले आहेत.
रस्त्याच्या मुख्य भागात फलके लावणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे. आयुक्त डॉ. अशोेक करंजकर यांच्या निर्देशानुसार विभागीय अधिकाऱ्यांमार्फत ही कारवाई करण्यात येत आहे. कायमस्वरूपी ही धडक मोहीम राबविण्यात येईल. -श्रीकांत पवार, उपायुक्त, कर संकलन विभाग, मनपा