नाशिक महापालिकेच्या बेल महोत्सवाला प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2020 04:10 PM2020-02-21T16:10:32+5:302020-02-21T16:12:25+5:30

नाशिक - बेलासारख्या औषधी वनस्पतीची अधिकाधिक लागवड व्हावी यासाठी महानगरपालिकेच्या वतीने महाशिवरात्रीचे औचित्य साधून आजपासून बेल महोत्सवात राबविण्यास प्रारंभ झाला असून पुष्प प्रदर्शनात भेट देणाऱ्यांना बेलाची रोपे वाटप करण्यात आली.

Nashik Municipal Bell Festival starts | नाशिक महापालिकेच्या बेल महोत्सवाला प्रारंभ

नाशिक महापालिकेच्या बेल महोत्सवाला प्रारंभ

Next
ठळक मुद्देसह्याद्रीकार सयाजी शिंदे यांची संकल्पना तीन हजार रोपांचे वाटप होणार

नाशिक- बेलासारख्या औषधी वनस्पतीची अधिकाधिक लागवड व्हावी यासाठी महानगरपालिकेच्या वतीने महाशिवरात्रीचे औचित्य साधून आजपासून बेल महोत्सवात राबविण्यास प्रारंभ झाला असून पुष्प प्रदर्शनात भेट देणाऱ्यांना बेलाची रोपे वाटप करण्यात आली.

महापालिकेच्या उद्यान विभागाचे ब्रॅँड अ‍ॅम्बेसेडर सह्याद्री देवराईकार अभिनेते सयाजी शिंदे यांची ही संकल्पना आहे. सणाच्या निमित्ताने विविध वनस्पतींची लागवड करावी यासाठी त्यांनी श्रावणात बेल महोत्सवाची संकल्पना मांडण्यात आली होती. मात्र, श्रावणात काही अडचणींमुळे बेल महोत्सव साजरा करता आला नव्हता. मात्र, आता महाशिवरात्रीचे औचित्य साधून भगवान शंकराला प्रिय असलेल्या बेल रोपांचे वाटप करण्यास प्रारंभ झाला आहे.एकुण तीन हजार रोपांचे वाटप येत्या तीन दिवसात करण्यात येणार आहे.

महापालिकेचे आयुक्त तथा अध्यक्ष वृक्ष प्राधिकरण समिती राधाकृष्ण गमे व भारती गमे यांच्या शुभहस्ते प्रातिनिधिक स्वरूपात नागरिकांना बेलाची रोपे वाटप करण्यात आली.यावेळी कार्यक्र मास वृक्ष प्राधिकरण सदस्य शामकुमार साबळे,पुंडलिक गीते, नगरसेवक सुनील गोडसे,उद्यान विभाग प्रमुख शिवाजी आमले,कार्यकारी अभियंता महेश तिवारी,उद्यान निरीक्षक वसंत ढुमसे, राजेंद्र पांडे,रमेश भालेराव,जनसंपर्क अधिकारी नितीन गंभीरे आदी उपस्थित होते.तसेच नाशिक शहरातील नागरिकांनी नाशिक महानगरपालिकेच्या वतीने वाटप करण्यात आलेल्या बेलाच्या रोपांची लागवड करून शहरात जास्तीत जास्त बेलाच्या वृक्षांची संख्या वाढवून पर्यावरण विकासाला हातभार लावावा, असे आवाहन यावेळी गमे यांनी केले.

नाशिक शहरातील पूर्व विभागातील जिजामाता उद्यान, काठे गल्ली,इंदिरा नगर जॉगिंग ट्रॅक,पश्चिम विभागात राका कॉलनी उद्यान,कृषिनगर जॉगिंग ट्रॅक,नवीन नाशिक विभागात गणेश चौक बाल उद्यान,संत गाडगे महाराज उद्यान,पाटील नगर, स्वामी विवेकानंद नगर उद्यान, सातपूर विभागात काळे नगर जॉगिंग ट्रॅक, राज्य कर्मचारी वसाहत उद्यान, नाशिकरोड विभागात जेतवन नगर उद्यान,पंचवटी विभागात भावबंधन मंगल कार्यालय येथील उद्यान येथेही बेलाची रोपे वाटप करण्यात आली.

 

Web Title: Nashik Municipal Bell Festival starts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.