नाशिक महापालिकेला १८ दिवसात मिळाले तीन कोटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2020 06:34 PM2020-11-19T18:34:00+5:302020-11-19T18:37:11+5:30
नाशिक- कोरोना संकटाचा महापालिकेला मोठा आर्थिक फटका बसला असून यंदा घरपट्टीचे उद्दीष्ट घटूनही ते पुर्ण होेण्याची शक्यता कमीच आहे. त्या पार्श्वभूमीवर महापालिकेने लागु केलेल्या अभय येाजनेला चांगलाप्रतिसाद मिळाल असून १ ते १८ नोव्हेंबर या अवघ्या १८ दिवसातच ३ कोटी १ लाख रूपयांची थकबाकी वसुल झाली आहे.
नाशिक- कोरोना संकटाचा महापालिकेला मोठा आर्थिक फटका बसला असून यंदा घरपट्टीचे उद्दीष्ट घटूनही ते पुर्ण होेण्याची शक्यता कमीच आहे. त्या पार्श्वभूमीवर महापालिकेने लागु केलेल्या अभय येाजनेला चांगलाप्रतिसाद मिळाल असून १ ते १८ नोव्हेंबर या अवघ्या १८ दिवसातच ३ कोटी १ लाख रूपयांची थकबाकी वसुल झाली आहे.
महापालिकेने गेल्यावर्षी १ एप्रिल १९ ते ३१ मार्च २०२० या कालावधीत १४१ कोटी रूपये वसुल करण्यात आले होते. त्यामुळे १ एप्रिल २०२० ते ३१ मार्च २०२१ या कालावधीत १७० कोटी रूपयांचे घरपट्टी वसुलीचे उद्दीष्ट अंदाजपत्रकात देण्यात आले आहे. परंतु २३ मार्च पासून कोरोनाच्या महामारीमुळे महापालिकेच्या वसुलीवर प्रतिकुल परीणाम झाला. त्यातच दुकाने, कारखाने आणि खासगी कार्यालयात अनेकांचे वेतन निम्म्यावर आले आणि काहींच्या तर नोकऱ्या गेल्या. छोट्या विक्रेत्यांचे तर व्यवहार ठप्प झाले. या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी कर वसुली कठोर पध्दतीने वसुल न करता किंवा अधिक भुर्दंड न लादता आधी ऑनलाईन घरपट्टी वसुलीची मुदत वाढवली आणि आता तर १ नोव्हेंबर पासून थकबाकी वसुलीसाठी अभय योजना जाहिर करण्यात आली आहे. त्यानुसार १ नोव्हेंबर ते १५ जानेवारी पर्यंत थकीत घरपट्टी भरणाऱ्यांना शास्तीत (दंड) ७५ टक्के सुट देण्यात येणार आहे. तर १६ जानेवारी ते १५ फेब्रुवारी पर्यंत थकबाकी भरल्यास शास्तीत ५० ट्क्के आणि १६ फेब्रुवारी ते २८ फेब्रुवारी पर्यंत थकबाकी भरल्यास २५ टक्के सुट दंडाच्या रकमेत मिळणार आहे.
योजनेला सुरूवात झाल्यानंतर दिवाळी कालावधी असतानाही चांगला प्रतिसाद मिळाला आहे. त्यानुसार १८ दिवसातच ३ केाटी १ लाख रूपये वसुल झाले आहेत. त्यामुळे आता २८ फेब्रुवारी पर्यंत थकबाकी चांगलीच वसुल हेाण्याची शक्यता आहे, असे उपआयुक्त (कर संकलन) प्रदीप चौधरी यांनी सांगितले.