नेट झीरो कार्बनसाठी नाशिक महापालिकेने घेतला जागतिक मोहिमेत सहभाग शाश्वत विकास: राज्यातील पहिली महापालिका, शहरातील शुद्ध हवेसाठी करणार प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2021 12:35 AM2021-08-21T00:35:14+5:302021-08-21T00:35:46+5:30
नाशिक : उत्तम हवापाणी हा नाशिक शहराचा लौकिक असला तरी देशातील प्रमुख प्रदूषणकारी शहरात नाशिकचाही समावेश झाला आहे. अशावेळी शाश्वत आणि पर्यावरण स्नेही विकासावर भर देण्यासाठी नाशिक महापालिकेने पुढाकार घेतला असून कार्बन उत्सर्जन रोखण्यासाठी रेस टू झीरो या मोहिमेत सहभाग घेतला आहे. महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी नुकतीच त्यासाठी स्वाक्षरी केली आहे. नाशिक हे अशाप्रकारच्या मोहिमेत सहभागी होणारे देशपातळीवरील पहिले नॉन मेट्रो शहर आहे.
नाशिक : उत्तम हवापाणी हा नाशिक शहराचा लौकिक असला तरी देशातील प्रमुख प्रदूषणकारी शहरात नाशिकचाही समावेश झाला आहे. अशावेळी शाश्वत आणि पर्यावरण स्नेही विकासावर भर देण्यासाठी नाशिक महापालिकेने पुढाकार घेतला असून कार्बन उत्सर्जन रोखण्यासाठी रेस टू झीरो या मोहिमेत सहभाग घेतला आहे. महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी नुकतीच त्यासाठी स्वाक्षरी केली आहे. नाशिक हे अशाप्रकारच्या मोहिमेत सहभागी होणारे देशपातळीवरील पहिले नॉन मेट्रो शहर आहे.
राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली कार्बन न्यूट्रल करण्यासाठी नाशिक शहराच्या वतीने आयुक्त कैलास जाधव यांनी गेल्या मे महिन्यातच डिजिटल स्वाक्षरी केली होती. आता नाशिक प्रत्यक्ष दस्तावेजांवर आयुक्तांनी सही केली आहे. झपाट्याने विकसित होणाऱ्या शहरात देशपातळीवर नाशिकचा क्रमांक अत्यंत वरचा आहे; मात्र गेल्या काही वर्षात वाढते शहरीकरण आणि त्यापाठोपाठ आलेल्या समस्यांनी प्रदूषण देखील वाढले आहे. केंद्र शासनाच्या नॅशनल क्लीन एअर प्रोग्रॅममध्ये नाशिकचा समावेश करण्यात आला असून महापालिका त्यासाठी देखील वेगवेगळे उपक्रम प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या सहकार्याने राबवत आहे. अलीकडेच नाशिक महापालिकेला क्लीन एअर प्रोग्राम अंतर्गत वीस कोटी रुपयांचे अनुदान प्राप्त झाले असून त्या अंतर्गत नाशिक महापालिकेने शहरातील वेगवेगळ्या चार अमरधाममध्ये विद्युतदाहिनी बसवण्याची कार्यवाही सुरु केली आहे. जेणेकरून लाकडाचा वापर कमी होईल. अशाच प्रकारे धुलीकण कमी करण्यास अन्य अनेक उपाय देखील केले जात आहेत.
नेट झीरो कार्बनसाठी नाशिक महापालिकेने तयारी केली आहे. नाशिक शहराला २०५० पर्यंत नेट झीरो करण्यासाठी संयुक्त राष्ट्र क्लायमेट चेंज अंतर्गत रेस टू झीरो अंतर्गत महापालिकेने भाग घेतला आहे. या अंतर्गत जागतिक स्तरावर कार्बन उत्सर्जन २०३० पर्यंत अर्धे करण्याचे उद्दिष्ट आहे. तसेच वैयक्तिक पातळीवर २०५० पर्यंत नेट झीरो कार्बनचे उद्दिष्ट असणार आहे. नोव्हेंबर महिन्यात या मोहिमेत सहभागी सदस्यांची ग्लासगो येथे बैठक होणार आहे.
इन्फो..
नाशिक महापालिकेने या उद्दिष्टाच्या पूर्ततेसाठी प्रत्यक्ष कामे देखील सुरू केली असून स्मार्ट रोड तयार करतानाच सायकलिंगला प्रोत्साहन देण्यासाठी पायाभूत सुविधा तयार करण्यावर भर दिला आहे. शहराची सार्वजनिक वाहतूक सक्षम करण्यासाठी बस सेवा सुरू करताना इलेक्ट्रिकल आणि सीएनजी बसला प्राधान्य दिले असून त्या माध्यमातून कार्बन फ्री वाहतुकीवर भर देण्यात आला आहे. याशिवाय महापालिकेने अक्षय ऊर्जे अंतर्गत सौर ऊर्जेवर देखील भर दिला आहे.
इन्फो...
नाशिक महापालिकेचे उद्दिष्ट
- संपूर्ण शहरात अति महत्त्वाची आणि नागरिकांना आवश्यक असलेली वाहने अवघ्या पंधरा ते तीस मिनिटात गाठता येईल अशी अतिपरिचित क्षेत्रे विकसित केली जाणार आहेत.
- २०२५ पर्यंत झीरो कार्बन उत्सर्जन बस प्राप्त करून घेण्यात येणार आहेत. म्हणजे महापालिकेच्या ताफ्यात सर्व पर्यावरण स्नेही बस असतील.
- २०३० पासून नेट झीरो कार्बन इमारती सुरू करण्यासाठी महापालिकेच्या वतीने रोडमॅप तयार करण्यात येणार आहे.
इन्फो...
नाशिक