नाशिक महापालिका शिवसेना स्वबळावरच लढणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2021 04:11 AM2021-06-26T04:11:30+5:302021-06-26T04:11:30+5:30

महापालिकेची आगामी निवडणूक स्वबळावर लढवण्याची तयारी पूर्ण करण्यात आली असून, पक्षात अन्य पक्षातील नगरसेवक येऊ दिले जातील. परंतु ज्या ...

Nashik Municipal Corporation Shiv Sena will fight on its own | नाशिक महापालिका शिवसेना स्वबळावरच लढणार

नाशिक महापालिका शिवसेना स्वबळावरच लढणार

googlenewsNext

महापालिकेची आगामी निवडणूक स्वबळावर लढवण्याची तयारी पूर्ण करण्यात आली असून, पक्षात अन्य पक्षातील नगरसेवक येऊ दिले जातील. परंतु ज्या ठिकाणी शिवसेनेचे विद्यमान नगरसेवक आहेत किंवा अन्य प्रभावी उमेदवार ठरू शकतील, असे कार्यकर्ते आहेत, त्याठिकाणी मात्र अन्य पक्षातील इच्छुकांना विचारपूर्वक संधी दिली जाईल, असेही या पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. लोकमत संवाद उपक्रमात शिवसेनेचे महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर, महापालिकेतील विरोधी पक्ष नेते अजय बोरस्ते आणि गटनेता विलास शिंदे यांनी विविध विषयांवर मते प्रदर्शित केली. लोकमतचे कार्यकारी संपादक मिलिंद कुलकर्णी आणि सहाय्यक उपाध्यक्ष बी. बी. चांडक यांनी त्यांचे स्वागत केेले.

महापालिकेतील सत्तारूढ भाजपाने काय काम केले, हे वेगळे सांगण्याची गरज नाही. परंतु त्यांच्यावर टीका करण्यापेक्षा शिवसेनेने काय करून दाखवले, यावर भर दिला जाणार आहे. राज्यात शिवसेनेची सत्ता आहे. त्यामुळे या काळात काही चांगले प्रकल्प यावेत, यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. त्यानुसार झोपडपट्टीमुक्त शहरासाठी एसआरए योजना राबविणे, रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंट, वाहनतळासाठी राखीव भू‌खंडावर बहुमजली वाहनतळ उभारणे, अशा अनेक योजनांवर नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या दालनात बैठक बोलावण्यात येणार आहे, असे सुधाकर बडगुजर यांनी सांगितले, तर गडकिल्ले संवर्धनासाठी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे आराखडा सादर करण्यात येेणार आहे, हा प्रकल्प मंजूर झाल्यास नाशिकच्या पर्यटन क्षेत्राला मोठी चालना मिळेल, असेही ते म्हणाले.

कोरोना काळात शिवसेनेने रुग्णांपासून वंचित घटकांपर्यंत सर्वांना प्रचंड मदत केली. रुग्णालये अ्पुरी पडत असताना शिवसेनेच्या पुढाकाराने खासगी डॉक्टरांच्या मदतीने कोविड सेंटर्स उभारली, अशी माहिती गटनेता विलास शिंदे यांनी दिली. वंचितांसाठी डबे देऊन साऱ्याच घटकांना मोठा दिलासा देण्याचे काम शिवसेनेने केले, असेही त्यांनी सांगितले.

इन्फेा...

राज्यात भाजपाची सत्ता असताना काय केले?

राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आल्यानंतर महापालिकेत भाजपाची सत्ता असल्याने कोंडी केली जात असल्याचा आरोप महापौर सतीश कुलकर्णी यांनी केला होता. त्यावर विरोधी पक्ष नेते अजय बोरस्ते यांनी पलटवार करताना महाविकास आघाडीची सत्ता दीड दोन वर्षांपूर्वी आली. त्यापूर्वी राज्यात भाजपाचीच सत्ता हाेती. त्या काळात कामे झाली नाहीत, असा प्रश्न केला. महापालिकेतील कोणत्याही प्रलंबित प्रश्नावर महापौरांनी शासनाला पत्र लिहिले असेल तर स्पष्ट करावे, असेही ते बोरस्ते म्हणाले.

--------------

छायाचित्र २४ पीएचजेयु ११५

===Photopath===

250621\25nsk_8_25062021_13.jpg

===Caption===

शिवसेना लोकसंवाद

Web Title: Nashik Municipal Corporation Shiv Sena will fight on its own

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.