नाशिक महापालिकेतील पाच कर्मचारी निलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2018 01:25 AM2018-03-13T01:25:04+5:302018-03-13T01:25:04+5:30

महापालिकेतील घरपट्टी वसुली विभागातील दोघा कर्मचाºयांना कर्तव्यात कसूर केल्याबद्दल तर आरोग्य विभागातील गैरहजर कर्मचाºयाची हजेरी लावणाºया स्वच्छता निरीक्षक, मुकादमासह गैरहजर महिला कर्मचाºयाला निलंबित करण्याचे आदेश प्रशासनाने काढले आहे.

Nashik Municipal Corporation suspended five employees | नाशिक महापालिकेतील पाच कर्मचारी निलंबित

नाशिक महापालिकेतील पाच कर्मचारी निलंबित

Next

नाशिक : महापालिकेतील घरपट्टी वसुली विभागातील दोघा कर्मचाºयांना कर्तव्यात कसूर केल्याबद्दल तर आरोग्य विभागातील गैरहजर कर्मचाºयाची हजेरी लावणाºया स्वच्छता निरीक्षक, मुकादमासह गैरहजर महिला कर्मचाºयाला निलंबित करण्याचे आदेश प्रशासनाने काढले आहे.  आरोग्य विभागातील तीनही कर्मचाºयांवर तर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश आयुक्त तुकाराम मुंढे यांनी प्रशासनास दिले आहेत. त्यामुळे, कामचुकार आणि महापालिकेची फसवणूक करणाºया कर्मचाºयांचे धाबे दणाणले आहे.  महा-पालिकेच्या घरपट्टी विभागातील नाशिककरोड येथील विभागीय कार्यालयातील वरिष्ठ लिपिक विनायक मोहन साळवे आणि सातपूर विभागीय कार्यालयातील कनिष्ठ लिपिक सागर रघुनाथ साळवी यांना प्रशासनाने निलंबित केले आहे. सदर दोन्ही कर्मचाºयांवर घरपट्टी वसुली कामकाजात कर्तव्यात कसूर केल्याचा आरोप आहे. घरपट्टीच्या बिलांचे वाटप न करणे, विभागीय अधिकाºयांनी दिलेल्या सूचनांचे पालन न करणे, वरिष्ठ अधिकाºयांशी गैरवर्तुणक  या बाबी उपआयुक्तांच्या निदर्शनास आल्यानंतर प्रशासनाकडे त्यांच्यावर निलंबनाच्या कारवाईचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता.त्यानुसार, आयुक्तांनी या दोघा कर्मचाºयांच्या निलंबनाचे आदेश काढले आहेत. याचबरोबर, आरोग्य विभागातील तिघा कर्मचाºयांनाही निलंबित करण्यात आले आहेत. अतिरिक्त आयुक्त किशोर बोर्डे यांनी नाशिकरोड येथील हजेरी शेडवर अचानक भेट देऊन पाहणी केली असता तेथे कार्यरत असलेले स्वच्छता निरीक्षक एकनाथ ताठे व मुकादम युवराज जाधव यांनी हजेरी शेडवरील सफाई कर्मचारी कामावर हजर नसताना त्यांची हजेरी लावल्याचे निदर्शनास आले.  तसेच श्रीमती वैशाली ताठे या सफाई कामगार कामावर हजर आढळून आल्या नाहीत. त्यामुळे, आरोग्य विभागाच्या अहवालानंतर या तीनही कर्मचाºयांना निलंबित करण्याचे आदेश काढण्यात आले.  याशिवाय, आरोग्य विभागातील या तीनही कर्मचाºयांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याचेही आदेश आयुक्त तुकाराम मुंढे यांनी प्रशासनाला दिले आहेत.
अचानक भेटी देणार
सफाई कामगारांच्या हजेरी शेडवर अधिकारी कधीही केव्हाही अचानक भेटी देऊन पाहणी करणार आहेत. याचवेळी, नेमून दिलेल्या भागात वेळेत साफसफाई झाली नसल्याचे निदर्शनास आल्यास, प्रत्यक्षात कामावर हजर नसल्याचे आढळून आल्यास संबंधितांवर निलंबनाची कारवाई करण्याबरोबरच फौजदारी गुन्हेही दाखल केले जाणार आहेत. सोमवारी (दि.१२) आयुक्तांनी केलेल्या या कारवाईमुळे कामचुकार कर्मचाºयांचे धाबे दणाणले आहे.

Web Title: Nashik Municipal Corporation suspended five employees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.