नाशिक महापालिकेच्या वतीने बेल महोत्सव साजरा करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2019 07:05 PM2019-06-05T19:05:24+5:302019-06-05T19:10:42+5:30
नाशिक- पर्यावरण जागृती करतानाच लोकसहभाग वाढविण्यासाठी महापालिकेच्या वनराई प्रकल्पाबरोबरच आता बेलाच्या झाडाचे महत्व वाढावे यासाठी बेलोत्सव साजरा करण्यात येणार असून तसा मनोदय नाशिक महापालिकेच्या देवराई प्रकल्पाचे सदिच्छादुत सयाजी पवार यांनी व्यक्त केली आणि महापालिकेने देखील त्यास दुजोरा दिला आहे, याशिवाय महापालिकेच्या वतीने मुल जन्माचा शुभप्रसंगी, वधु आगमनापासून दिवगंत व्यक्तीच्या नावाने वृक्ष लावण्याच्या स्मृतीवनापर्यंत विविध योजना राबविण्यात येणार असल्याची माहिती महापालिकेच्या वतीने पर्यावरणाच्या निमित्ताने देण्यात आली.

महापालिकेच्या वतीने फेब्रुवारी महिन्यात सहा विभागात देवराई प्रकल्प राबविण्यात आले आहेत. त्यासाठी सह्याद्री देवराईकार अभिनेते सयाजी पवार यांनी मोफत मार्गदर्शन केले असून त्यानंतरही त्यांनी अशाच प्रकारे महापालिकेला सहाय्य करण्याचे ठरविले. त्यामुळे महापालिकेने त्यांना सदिच्छादुत म्हणजेच ब्रॅँड अॅम्बेसेडर नियुक्त केले असून पर्यावरण दिनाच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या हस्ते आनंदवल्ली तसेच जुन्या नाशकात देवराई प्रकल्पांचे उदघाटन करण्यात आले.
नाशिक महापालिकेने पर्यावरर दिनाच्या पार्श्वभूमीवर सयाजी शिंदे यांच्याशी झालेल्या चर्चेनुसार काही निर्णय घेतले आहेत. त्याची माहिती शिंदे व आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी पत्रकार परिषदेत दिली. साताऱ्याच्या धर्तीवर नाशिक महापालिकेच्या वतीने श्रावणात बेलोत्सव घेतला जाईल. त्यात शाळकरी मुलांचा देखील सहभाग वाढविण्यात येईल. बेलाची पाने भगवान शंकराला वाहिली जात असली तरी काही वेळानंतर ते निर्माल्य बनते. त्यामुळे झाडालाच देव म्हणून त्याचे संवर्धन करा अशाप्रकारचा महोत्सव असणार आहे. याशिवाय वृक्षरोपणासाठी अन्य योजना देखील राबविण्यात येणार आहेत. त्यात मुलाचा जन्म झाल्यानंतर त्याच्या जन्मराशीच्या नक्षत्राचे झाडे संबंधीत हॉस्पीटल कडून मुलांना देण्याचे नियोेजन आहे. मुलाचा विवाह झाल्यानंतर घरात सुन आल्याने तसेच मुलीचा विवाह झाल्यानंतर तीची आठवण म्हणून देखील वृक्ष लाववा असे आवाहन करण्यात आले आहे. इतकेच नव्हे तर दिवगंत व्यक्तीच्या स्मृती टिकवण्यासाठी देखील वृक्ष लागवड करायची झाल्यास प्रशासन सहकार्य करणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. यावेळी उद्यान उपआयुक्त शिवाजी आमले, कार्यकारी अभियंता महेश तिवारी यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.