अवास्तव बिल आकारणाऱ्या रूग्णालयांना नाशिक मनपा टाळे ठोकणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2021 07:22 PM2021-05-27T19:22:43+5:302021-05-27T19:25:43+5:30
नाशिक- कार्पोरेट कंपन्यांच्या रूग्णालयांकडून अवास्तव बिल आकारणी होत असल्याचा मुद्दा आता ऐरणीवर आला आहे. रूग्णांना दिल्या जाणाऱ्या प्रशासनाच्या लेखापरीक्षकांनी कठोरपणे बिले तपासवीत तसेच रूग्णालयांन देखील अवास्तव बिले आकारू नये अन्यथा महापालिकेच्या वतीने रूग्णालयांना टाळे ठोकण्यात येईल असा इशारा महापौर सतिश कुलकर्णी यांनी दिला आहे.
नाशिक- कार्पोरेट कंपन्यांच्या रूग्णालयांकडून अवास्तव बिल आकारणी होत असल्याचा मुद्दा आता ऐरणीवर आला आहे. रूग्णांना दिल्या जाणाऱ्या प्रशासनाच्या लेखापरीक्षकांनी कठोरपणे बिले तपासवीत तसेच रूग्णालयांन देखील अवास्तव बिले आकारू नये अन्यथा महापालिकेच्या वतीने रूग्णालयांना टाळे ठोकण्यात येईल असा इशारा महापौर सतिश कुलकर्णी यांनी दिला आहे.
आयुक्त कैलास जाधव यांच्याशी देखील महापौर आणि आमदार देवयानी फरांदे यांनी चर्चा केली. त्यानंतर बिल तपासणाऱ्या ऑडीटर्सवर नजर ठेवण्यासाठी प्रशासकीय समिती नेमण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
शहरात देान दिवसांपूर्वी वेाक्हार्ट रूग्णालयात खासगी रूग्णालयांत दीड लाख रूपयांच्या अनामत रक्कम मिळण्याच्या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र भावे यांनी रूग्णाच्या नातेवाईकासमवेत आंदेालन केल्याने हा विषय गाजत असून त्या पार्श्वभूमीवर रामायण बंगल्यावर महापौर सतीश कुलकर्णी, आमदार देवयानी फरांदे व भाजप शहराध्यक्ष गिरीश पालवे यांनी मुख्यलेखा परीक्षक बी. जी. सोनकांबळे यांच्यासमवेत बैठक घेतली. वोक्हार्ट रूग्णालयाच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून या प्रकरणात मुख्यलेखा परीक्षकांना लक्ष घालण्यास सांगण्यात आले. शहरातील कोणत्याही रूग्णालयात अनियमीतता आढळलल्यास कारवाई करण्याचे आदेश देखील देण्यात आले.
कोरोना बाधीतांवर उपचारसाठी अनेक खासगी रूग्णालय चांगली सेवा देत आहेत. मात्र काही मेाजक्या रूग्णालयातील बिल आकारणीत गोंधळ असल्याच्या तक्रारी आहेत, त्यांच्यावर नियंत्रण आणाव अशी मागणी यावेळी करण्यात आली. यावेळी लेखा परीक्षकांवर नियंत्रणासाठी शासनाच्या लेखा परीक्षण विभागाकडून बारा अधिकारी नियुक्त करून घेण्यात आले आहेत. त्याच प्रमाणे महापालिकेच्या मुख्यलेखापरीक्षकांच्या अध्यक्षतेखाली देखील एक समिती नियुक्त करण्यात आल्याचे आयुक्तांनी सांगितले.
--
महापौर हेल्पलाईन सुरू करणार
रूग्णालयाबाबतील तक्रारी तसेच अन्य काही तक्रारी आणि शंका निरसनासाठी महापौरांच्या वतीने हेल्पलाईन सुरू करण्यात येणार आहेत. त्यामुळे नागरीकांनी त्यावर तक्रारी कराव्यात असे आवाहन महापौर सतिश कुलकर्णी यांनी केले आहे. महापौरांचे निवासस्थान असलेल्या रामायण याठिकाणी हेल्पलाईन सेंटर सुरू करण्यात येणार आहे.