अवास्तव बिल आकारणाऱ्या रुग्णालयांना नाशिक मनपा टाळे ठोकणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2021 04:12 AM2021-05-28T04:12:20+5:302021-05-28T04:12:20+5:30

नाशिक : काॅर्पोरेट कंपन्यांच्या रुग्णालयांकडून अवास्तव बिल आकारणी होत असल्याचा मुद्दा आता ऐरणीवर आला आहे. रुग्णांना दिल्या जाणाऱ्या प्रशासनाच्या ...

Nashik Municipal Corporation will lock up the hospitals which are charging unrealistic bills | अवास्तव बिल आकारणाऱ्या रुग्णालयांना नाशिक मनपा टाळे ठोकणार

अवास्तव बिल आकारणाऱ्या रुग्णालयांना नाशिक मनपा टाळे ठोकणार

Next

नाशिक : काॅर्पोरेट कंपन्यांच्या रुग्णालयांकडून अवास्तव बिल आकारणी होत असल्याचा मुद्दा आता ऐरणीवर आला आहे. रुग्णांना दिल्या जाणाऱ्या प्रशासनाच्या लेखापरीक्षकांनी कठोरपणे बिले तपासावीत तसेच रूग्णालयांनी देखील अवास्तव बिले आकारू नयेत. अन्यथा महापालिकेच्यावतीने रुग्णालयांना टाळे ठोकण्यात येईल असा इशारा महापौर सतीश कुलकर्णी यांनी दिला आहे. आयुक्त कैलास जाधव यांच्याशी देखील महापौर आणि आमदार देवयानी फरांदे यांनी चर्चा केली. त्यानंतर बिल तपासणाऱ्या ऑडीटर्सवर नजर ठेवण्यासाठी प्रशासकीय समिती नेमण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

शहरात दोन दिवसांपूर्वी वोक्हार्ट रुग्णालयात खासगी रुग्णालयांत दीड लाख रूपयांच्या अनामत रक्कम मिळण्याच्या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र भावे यांनी रुग्णाच्या नातेवाईकांसमवेत आंदोलन केल्याने हा विषय गाजत असून त्या पार्श्वभूमीवर रामायण बंगल्यावर महापौर सतीश कुलकर्णी, आमदार देवयानी फरांदे व भाजप शहराध्यक्ष गिरीश पालवे यांनी मुख्यलेखा परीक्षक बी. जी. सोनकांबळे यांच्यासमवेत बैठक घेतली. वोक्हार्ट रुग्णालयाच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून या प्रकरणात मुख्यलेखा परीक्षकांना लक्ष घालण्यास सांगण्यात आले. शहरातील कोणत्याही रुग्णालयात अनियमितता आढळल्यास कारवाई करण्याचे आदेश देखील देण्यात आले.

कोरोना बाधितांवर उपचारासाठी अनेक खासगी रुग्णालये चांगली सेवा देत आहेत. मात्र, काही मेाजक्या रुग्णालयातील बिल आकारणीत गोंधळ असल्याच्या तक्रारी आहेत. त्यांच्यावर नियंत्रण आणावे अशी मागणी यावेळी करण्यात आली. यावेळी लेखा परीक्षकांवर नियंत्रणासाठी शासनाच्या लेखा परीक्षण विभागाकडून बारा अधिकारी नियुक्त करून घेण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे महापालिकेच्या मुख्य लेखापरीक्षकांच्या अध्यक्षतेखाली देखील एक समिती नियुक्त करण्यात आल्याचे आयुक्तांनी सांगितले.

इन्फो..

महापौर हेल्पलाईन सुरू करणार

रुग्णालयाबाबतच्या तक्रारी तसेच अन्य काही तक्रारी आणि शंका निरसनासाठी महापौरांच्यावतीने हेल्पलाईन सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांनी त्यावर तक्रारी कराव्यात असे आवाहन महापौर सतीश कुलकर्णी यांनी केले आहे. महापौरांचे निवासस्थान असलेल्या रामायण याठिकाणी हेल्पलाईन सेंटर सुरू करण्यात येणार आहे.

Web Title: Nashik Municipal Corporation will lock up the hospitals which are charging unrealistic bills

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.