नाशिक महापालिका कोरोना प्रतिबंधक लस खरेदी करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2021 02:10 PM2021-05-18T14:10:25+5:302021-05-18T14:12:47+5:30
नाशिक- कोरोना प्रतिबंधक लसीकरणासाठी नागरीक तयार असताना शासनाकडून अपुरा पुरवठा होत असल्याने नाशिक महापालिकेने आता ग्लोबल टेंडर काढून लस खरेदी करण्याचा आणि त्या नागरीकांना देण्याचा निर्णय घेतला आहे. महापौर सतीश कुलकर्णी तसेच आयुक्त कैलास जाधव यांच्यात मंगळवारी (दि.१८) झालेल्या बैठकीत निर्णय घेण्यात आला.

महापालिकेच्या वतीने कोविशील्ड आणि कोवॅक्सीजन या देान्ही लसींच्या खरेदीचे टेंडर काढण्यात येणार आहेत. त्याच बरोबर केंद्र शासनाने मान्यता दिल्यानंतर स्फुटनिक आणि फायबर लस खरेदीला प्राधान्य देण्यात येणार आहे. लसींच्य टेंडरबाबत मुंबई, पुणे आणि ठाणे महापालिकेशी चर्चा करण्याचाही निर्णय यावेळी घेण्यात आला. त्यास सर्व पक्षीय गटनेत्यांच्या बैठकीस लस खरेदीसाठी देण्यात आली. नाशिक शहराची लोकसंख्या सुमारे वीस लाख असून तीन लाख नागरीकांना डोस देण्यात आले आहेत. केंद्र आणि राज्य सरकारकडून आणखी पाच लाख लसींचे डोस मिळण्याची शक्यता आहे. कोरोनाची संभाव्य तिसरी लाट आणि सध्या लसीकरणासाठी नागरीकांची हेाणारी धावपळ लक्षात घेता अशाप्रकारे लस खरेदीसाठी महापालिकेनेच ग्लोबल टेंडर काढावे आणि लस खरेदी करून नागरीकांना द्यावेत अशा प्रकारचा प्रस्ताव महापौर सतीश कुलकर्णी यांनी दिला होता.
सोमवारी (दि.१७) विधान सभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत यासंदर्भात आयुक्तांकडे बैठक हेाणार होती. मात्र ती बैठक होऊ न शकल्याने मंगळवारी (दि.१८) आयुक्तांच्या दालनात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.