नाशिक महापालिका उभारणार ११ ऑक्सिजन प्रकल्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2021 04:11 AM2021-06-21T04:11:42+5:302021-06-21T04:11:42+5:30

नाशिक : महापालिकेच्या डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात घडलेली गळती दुर्घटना तसेच दुसऱ्या लाटेत जाणवणारी टंचाई या पार्श्वभूमीवर नाशिक महापालिकेने ...

Nashik Municipal Corporation will set up 11 oxygen projects | नाशिक महापालिका उभारणार ११ ऑक्सिजन प्रकल्प

नाशिक महापालिका उभारणार ११ ऑक्सिजन प्रकल्प

Next

नाशिक : महापालिकेच्या डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात घडलेली गळती दुर्घटना तसेच दुसऱ्या लाटेत जाणवणारी टंचाई या पार्श्वभूमीवर नाशिक महापालिकेने ऑक्सिजनच्या बाबतीत स्वयंपूर्ण होण्याचा निर्णय घेतला असून, ११ प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेतला आहे.

यातील बहुतांशी प्रकल्प हे स्वयंसेवी संस्था तसेच उद्योजकांच्या दायित्व निधीतून होणार आहेत

नाशिक महापालिकेच्या डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात २१ एप्रिल रोजी ऑक्सिजन गळतीची दुर्घटना घडली होती. यावेळी २२ जणांचा बळी गेला होता. महापालिकेच्या वतीने या रुग्णालयात दहा किलो लिटर्सची टाकी बसविण्यात आली आहे. त्यातून रुग्णालयात ऑक्सिजन पुरवठा करताना पाइपलाइनचे नोझल तुटल्याने ही दुर्घटना घडली होती. या दुर्घटनेनंतर तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयातून जम्बो ऑक्सिजन सिलिंडर मागविण्यात आले होते. त्यामुळे दुर्घटनेनंतर पर्यायी ऑक्सिजन व्यवस्था या रुग्णालयात नसल्याचे आढळले होते. त्यामुळे दुर्घटनेनंतर महापालिकेने धडा घेतला असून, डॉ. झाकीर हुसेन आणि नवीन बिटको या दोन्ही रुग्णालयांमध्ये तीन किलो लिटरच्या दोन अतिरिक्त ऑक्सिजन टाक्या बसविल्या आहेत याशिवाय कोरोनाबधितांची संख्या शिगेला असताना ऑक्सिजन मिळवण्यात येणाऱ्या अडचणी लक्षात घेता महापालिकेने स्वतः ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प साकारण्याचे ठरविले आहे. बहुतांशी प्रकल्प हे हवेतून ऑक्‍सिजन निर्मिती करणारे आहेत यातील दोन प्रकल्प नवीन बिटको रुग्णालयात स्थापित करण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे झाकीर हुसेन रुग्णालयातही असाच प्रकल्प साकारला जात आहे लहान मोठ्या क्षमतेचे एकूण ११ निर्मिती प्रकल्प महापालिका साकारणार असून, यातील काही प्रकल्प हे थेट कोविड सेंटरमध्ये उभारले जाणार आहेत कोरोनाची संभाव्य तिसरी लाट लवकरच येणार असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे त्यामुळे त्यांची कोणतीही टंचाई भासू नये यासाठी महापालिकेने निर्मिती प्रकल्प करण्याचे ठरवले आहे. राजे संभाजी स्टेडियम पंचवटीतील मीनाताई ठाकरे स्टेडियम येथील नियोजित कोविड सेंटरमध्ये ऑक्सिजन निर्मिती करून त्याद्वारे रुग्णांच्या बेडपर्यंत ऑक्सिजन पुरवण्याची व्यवस्था करण्यात येत आहे. त्यामुळे काही कोविड सेंटरमध्ये तूर्तास रुग्ण दाखल करणे बंद करण्यात आले आहे. विशेष म्हणजे बहुतांशी प्रकल्प उभारण्यासाठी महापालिकेने उद्योजकांची आणि स्वयंसेवी संस्थांची मदत घेतली आहे, अशी माहिती महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी दिली.

इन्फो..

कोरोनाची दुसरी लाट भयंकर होती. त्यातील उणिवा दूर करताना ऑक्सिजननिर्मिती प्रकल्प साकारण्यात येणार आहे. त्यातील बहुतांश प्रकल्प हे उद्योजकांच्या सामाजिक दायित्व निधीतून साकारले जात आहे.

कैलास जाधव, आयुक्त, महापालिका

Web Title: Nashik Municipal Corporation will set up 11 oxygen projects

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.