नाशिक महापालिकेचा २ हजार २२९ कोटींचा अर्थसंकल्प, वाचा एका क्लिकवर

By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2022 02:02 PM2022-02-08T14:02:49+5:302022-02-08T14:04:14+5:30

प्रशासकीय अंदाजपत्रक स्थायी समितीसमोर सादर करण्यात आल. या बजेटची वैशिष्ट्ये आणि प्रमुख मुद्दे खाली दिलेली आहेत. 

Nashik Municipal Corporation's budget of 2,229 crores, read on one click | नाशिक महापालिकेचा २ हजार २२९ कोटींचा अर्थसंकल्प, वाचा एका क्लिकवर

नाशिक महापालिकेचा २ हजार २२९ कोटींचा अर्थसंकल्प, वाचा एका क्लिकवर

googlenewsNext

नाशिक - केंद्र सरकारने देशाचा अर्थसंकल्प सादर केल्यानंतर मुंबई महापालिकेनंही आपलं बजेट मांडलं. त्यानंतर, नाशिक महापालिकेचा अर्थसंकल्प आज सादर करण्यात आला आहे. नाशिकराना दिलासा देणारा, कोणतीही करवाढ नसलेला २२१९ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प पालिका आयुक्त कैलास जाधव यांनी सादर केला. प्रशासकीय अंदाजपत्रक स्थायी समितीसमोर सादर करण्यात आल. या बजेटची वैशिष्ट्ये आणि प्रमुख मुद्दे खाली दिलेली आहेत. 

महापालिकेच्या बजेटमधून यंदा नाशिककरांना काय मिळणार, काय सुविधा उपलब्ध होाणार यावर एक नजर टाकूयात

१ यंदाचा नाशिक महापालिकेचा २२१९ कोटी रुपयांचा संकल्प सादर

२ नाशिकच्या बिटको रुग्णालयात मेडिकल कॉलेज उभारणी करता ६५ कोटी रुपयांची तरतूद

३ सार्वजनिक बांधकाम करता सर्वाधिक ३७८  कोटी रुपयांची तरतूद 

४ पर्यावरण आणि  गोदावरी संवर्धन करता गेल्या वर्षीच्या तुलनेत दुपटीने निधी यंदाच्या वर्षी २८ कोटी ८८ लाखाचा निधी

५ भावी नगरसेवकांसाठी  एकूण ८५.९८ कोटी , गेल्या वर्षी हाच निधी २३७ कोटी इतका होता.

६ नाशिककरांवर घरपट्टी पाणीपट्टी अतिरिक्त बोजा नाही , तर कोणतीही करवाढ नाही

७ नगरसेवक निधीतून कोणतीही वाढ नाही ३० लाख वार्षिक निधी कायम

८ नाशिक शहरबस सेवेसाठी ९० कोटीची तरतूद

९ नाशिकशहरातील उद्यान विकासासह सहाही विभागात १०  हजार वृक्ष लागवडीसाठी २१ कोटीची तरतूद

१० शहरात उभारल्या जाणाऱ्या आयटी पार्कसाठी दहा कोटी रुपयांची तरतूद

११ तर महापालिका निवडणूक खर्चासाठी 15 कोटी रुपयांचा निधी

१२ ई - स्मार्ट स्कूल योजना प्रकल्पासाठी अंदाजपत्रकात १५ कोटी रुपयांसह एकूण   शिक्षणासाठी २६ कोटीची तरतूद, शहरातील ६  विभागात स्मार्ट स्कूल उभारणार

१३ शिक्षणाच्या योजना करता ड्रोन सर्वेक्षण मॅपिंग करणार

१४ बांधकाम व्यवसायिकांना इलेक्ट्रिक वाहनचार्जिंग स्टेशन बंधनकारक करणार

१५ महापालिका पर्यावरण पूरक भांडे खरेदी करणार

१६ शहराच्या मुंबईनाका परिसरात महात्मा फुले सावित्रीबाई फुले संयुक्तिक पुतळ्यासह, पश्चिम विभागात छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, बिडी भालेकर येथे अण्णाभाऊ साठे पूर्णाकृती पुतळा, पंचवटीत महाराणा प्रताप पुतळा उभारणार

Web Title: Nashik Municipal Corporation's budget of 2,229 crores, read on one click

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.