कोरोनाच्या धास्ती अन जमावबंदीमुळे नाशिक महापालिकेची महासभा तहकुब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2021 01:31 PM2021-02-18T13:31:53+5:302021-02-18T13:34:11+5:30

नाशिक- काेरोना बाधीतांची संख्या वाढतअसल्याने पोलीसांनी जमावबंदी आदेश लागु केले असून त्यामुळे गुरूवारी (दि.१८) महापालिकेची महासभा महापौर सतीश कुलकर्णी यांनी तहकुब केली आहे. ही सभा दुरदृष्यप्रणालीव्दारे आयोजित करण्यात आली असली तरी सभागृहात देखील होणार होती. त्यामुळे सुमारे पंचवीस नगरसेवक देखील उपस्थित हेाते, परंतु जमावबंदीमुळे ही सभाच तहकुब करावी लागली. 

Nashik Municipal Corporation's general body meeting due to corona's fear and crowd ban | कोरोनाच्या धास्ती अन जमावबंदीमुळे नाशिक महापालिकेची महासभा तहकुब

कोरोनाच्या धास्ती अन जमावबंदीमुळे नाशिक महापालिकेची महासभा तहकुब

Next
ठळक मुद्दे महापौर सतीश कुलकर्णी यांचा निर्णयसभागृहात होते पंचवीस नगरसेवक

नाशिक- काेरोना बाधीतांची संख्या वाढतअसल्याने पोलीसांनी जमावबंदी आदेश लागु केले असून त्यामुळे गुरूवारी (दि.१८) महापालिकेची महासभा महापौर सतीश कुलकर्णी यांनी तहकुब केली आहे. ही सभा दुरदृष्यप्रणालीव्दारे आयोजित करण्यात आली असली तरी सभागृहात देखील होणार होती. त्यामुळे सुमारे पंचवीस नगरसेवक देखील उपस्थित हेाते, परंतु जमावबंदीमुळे ही सभाच तहकुब करावी लागली. 

गेल्या वर्षभरापासून महापालिकेच्या बहुतांश सभा दुरदृष्यप्रणालीव्दारे हेात आहेत. मात्र, नेाव्हेंबर नंतर कोरोना संसर्ग नियंत्रणात आल्यासारख्ये चित्र निर्माण झाल्यानंतर आता अशाप्रकारे दुरदृष्यप्रणालीव्दारे सभा न घेता प्रत्यक्ष सभागृहातच सभा घेण्याची मागणी होत होती. त्यातच राज्य शासनाने देखील महासभा वगळता अन्य सर्व समित्यांच्या सभा प्रत्यक्ष घेण्याची परवानगी दिली हेाती. परंतु तरीही नाशिक महापालिकेत सत्ताधारी भाजप जाणिवपूर्वक प्रत्यक्ष सभागृहात येण्यास टाळत असल्याचा आरोप केला होता.  दुरदृष्टप्रणालीव्दारे सभा घेताना जाणिवपूर्वक तांत्रिक बिघाड केला जात असल्याचे आरोपही विरोधकांनी केले होते. त्यामुळे गुरूवारी (दि.१८) सुमारे पन्नास टक्के सदस्कयांच्या उपस्थितीत प्रत्यक्ष महासभा घेण्याचे नियोजन महापौरांनी केले आणि पक्षाच्या संख्येच्या आधारेच सभागृहात उपस्थिती असावी असे सूचवले होते. मात्र, सभेची अधिसूचना जारी केल्यानंतर आठ दिवसातच शहरात चित्र बदलले असून शहरात केारोनाचे रूग्ण पुन्हा वाढु लागले. त्यामुळे गुरूवारी (दि.१८) महासभेचे काम सुरू होताच महापाैर सतीश कुलकर्णी यांनी कोरोनामुळे महासभा तहकुब करण्यात येत असल्याचे जाहरी केले. मात्र ही सभा पुन्हा केव्हा होणार हे जाहिर केलेले नाही. 

Web Title: Nashik Municipal Corporation's general body meeting due to corona's fear and crowd ban

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.