नाशिक महापालिकेच्या महासभेत बेकायदा भंगार बाजाराचा मुद्दा गाजणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2019 03:45 PM2019-07-17T15:45:26+5:302019-07-17T15:47:35+5:30
नाशिक- सातपुर अंबड लिंकरोडवरील भंगार दुकाने आणि गोदामे दोनदा हटविण्यात आल्यानंतर देखील पुन्हा ते त्याच ठिकाणी उभे राहत असून यासंदर्भात शिवसेनेचे नगरसेवक दिलीप दातीर यांनी शुकवारी (दि.१९) होणाऱ्या महासभेत लक्षवेधी सूचना दिली आहे. महापालिकेच्या वतीने भंगार दुकानांसंदर्भात उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे पालन केले जात नसून अनेक अधिकारीत अंतर्गत मदत करीत असल्याचा दातीर यांचा दावा आहे.

सातपुर अंबड लिंक रोडवरील बेकायदेशीर भंगार बाजाराने परीसरात प्रदुषण वाढत आहेच परंतु वाहतूक समस्या, चोºया असे अनेक प्रकार होत असल्याने दातीर यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यानुसार महापालिकेने तो हटविला. त्यानंतर पुन्हा बाजार सुर झाला तोही हटविला आणि आता पुन्हा बाजार जैसे थे झाला आहे. याठिकाणी भंगार व्यवसाय करता येणार नाहीच, शिवाय येथे माल ठेवता येणार नाही. बाजार बेकायदेशीर असल्याने त्यांना पर्यायी जागा प्रशासनाने देण्याची आवश्यकता नाही इतके सुस्पष्ट उच्च न्यायालयाचे आदेश असतानाही बाजार पुन्हा उभा राहात आहे, असा दातीर यांचा आरोप आहे.
महापालिकेचे अधिकारी सोयीने दुर्लक्ष करून अंतर्गतरीत्या बाजार वसविण्यास मदत केल्याचा आरोप दातीर यांनी केला आहे.