नाशिक मनपाचा रेमडेसिविर साठा संपुष्टात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2021 04:13 AM2021-04-13T04:13:57+5:302021-04-13T04:13:57+5:30
नाशिक : नाशिक महापालिकेत सध्या रेमडेसिविरचा साठा केवळ ५० शिल्लक आहे. टास्क फोर्सने सांगितल्यानुसार अद्याप तरी नाशिक महापालिकेच्या रुग्णालयांना ...
नाशिक : नाशिक महापालिकेत सध्या रेमडेसिविरचा साठा केवळ ५० शिल्लक आहे. टास्क फोर्सने सांगितल्यानुसार अद्याप तरी नाशिक महापालिकेच्या रुग्णालयांना किंवा खासगी रुग्णालयांना अद्याप पुरवठा करण्यात आलेला नाही. महापालिका रुग्णालयातील ज्या रुग्णांना सध्या रेमडेसिविरचे इंजेक्शन दुपारनंतरच दिेले जाते. त्या रुग्णांना सोमवारचा रेमडेसिविरचा डोस अद्याप मिळालेला नाही. नाशिकच्या महापालिका आयुक्तांनी मनपाच्या वतीने थेट कंपन्यांकडेच रेमडेसिविरच्या २० हजार डोसची मागणी नोंदवली आहे. मात्र, त्यातील केवळ ५ हजार रेमडेसिविरचा पुरवठा सोमवारी किंवा मंगळवारी होण्याची शक्यता मनपा आयुक्तांनी बोलून दाखवली आहे.
आज रेमडेसिविरचा उपलब्ध साठा - ५०
दररोजची गरज - ३५० रेमडेसिविर
कोट...
आमचे वडील गंभीर अवस्थेत आहेत. त्यांना रेमडेसिविरचा डोस देणे आवश्यकच आहे. मात्र, रविवारपासून मनपा दवाखान्यातील डोसदेखील संपत आल्याचे समजते आहे. त्यामुळे आता आमच्या पेशंटला पुढचे दोन डोस मिळणार की नाही ? अशी चिंता लागली आहे.
- संदीप आव्हाड, बाधिताचे नातेवाईक