संसर्गजन्य आजारासाठी नाशिक मनपाचे स्वतंत्र रूग्णालय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2020 05:38 PM2020-04-10T17:38:56+5:302020-04-10T17:43:04+5:30

नाशिक-  सध्या संसर्ग जन्य आजारामुळे निर्माण झालेली परिस्थीती बघता अशाप्रकारच्या आजारासाठी स्वतंत्र रूग्णालय बांधण्याची सूचना स्थायी समितीचेनुतन सभापती गणेश गिते यांन प्रशासनाला दिल्या आहेत. यासंदर्भात तातडीनेप्रस्ताव तयार करण्याचे निर्देशही गिते यांनी दिले आहेत.

Nashik Municipal Independent Hospital for Infectious Diseases | संसर्गजन्य आजारासाठी नाशिक मनपाचे स्वतंत्र रूग्णालय

संसर्गजन्य आजारासाठी नाशिक मनपाचे स्वतंत्र रूग्णालय

Next
ठळक मुद्देसभापती गिते यांचा प्रस्तावकोरोनाबाबत उपाययोजनांचा आढावा

नाशिक सध्या संसर्ग जन्य आजारामुळे निर्माण झालेली परिस्थीती बघता अशाप्रकारच्या आजारासाठी स्वतंत्र रूग्णालय बांधण्याची सूचना स्थायी समितीचे नुतन सभापती गणेश गिते यांनी प्रशासनाला दिल्या आहेत. यासंदर्भात तातडीने प्रस्ताव तयार करण्याचे निर्देशही गिते यांनी दिले आहेत.

जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार गिते यांची समितीच्या सभापतीपदी बुधवारी (दि.८) निवड घोषीत केली त्यानंतर गिते यांनी गुरूवारी (दि. ९) सभापतीपदाचा कार्यभार स्विकारला. यावेळी महापौरसतीश कुलकर्णी, सभागृह नेते सतीश सोनवणे,गटनेता जगदीश पाटील, माजी महापौररंजना भानसी यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते. यानंतर गिते यांनी अधिका-यांची कोरोनाबाबत आढावा बैठक घेतली. डॉ. झाकीर हुसेन रूग्णालय,मनपाची अन्य रूग्णालये आणि तपोवन रूग्णालयात औषधांची ताजी स्थिती काय आहे हे तपासून घ्यावे आणि गरजेनुसार औषधे तसेच जंतु नाशके खरेदीसाठी अल्पमुदतीच्या निविदा मागवून घ्याव्यात असेही गिते यांनी सांगितले.

महापालिकेच्या वतीने वापरण्यात येणारी जंतु नाशके आणि अन्य बाबतीत आढावादेखील गिते यांनी घेतला. त्याच बरोबर विभाग निहाय आरोग्य तपासणी केंद्रेसुरू करून त्यानुसार नागरीकांची आरोग्य तपासणी करावी तसेच नागरीकांना वैद्यकिय उपचार करावेत असेही गिते यांनी सांगितले.बैठकीस अतिरिक्त आयुक्त बी. जे. सोनकांबळे, शहर अभियंता संजय घुगे,आरोग्य वैद्यकिय अधिकारी डॉ. राजेंद्र त्र्यंबके, आरोग्याधिकारी डॉ.सुनील बुकाणे, सहाय्यक आरोग्याधिकारी डॉ. सचीन हिरे, डॉ. कल्पना कुटे,डॉ. प्रशांत शेटे, पशुवैद्यकिय अधिकारी डॉ. प्रमोद सोनवणे आदी उपस्थित होते.

Web Title: Nashik Municipal Independent Hospital for Infectious Diseases

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.