पर्यटनासाठी नाशिक जिल्हा मॉडेल म्हणून विकसीत करण्याची गरज: दत्ता भालेराव

By संजय पाठक | Published: March 7, 2020 11:29 PM2020-03-07T23:29:19+5:302020-03-07T23:32:07+5:30

नाशिक- महाविकास आघाडी सरकारच्या पहिल्याच अर्थसंकल्पात पर्यटन क्षेत्रासाठी १४०० कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली असून त्यामुळे राज्य सरकारला पर्यटन विषयक गांभिर्य असल्याचे स्पष्ट झाले आहे. राज्य सरकारने आता नाशिक सारखा सुवर्ण त्रिकोणातील एक जिल्हा पर्यटनासाठी मॉडेल म्हणून विकसीत करावा अशी मागणी नाशिक येथील पर्यटन व्यवसायिकांच्या संघटनेचे (तान) माजी अध्यक्ष दत्ता भालेराव यांनी केली आहे.

Nashik needs to be developed as district model for tourism: Datta Bhalerao | पर्यटनासाठी नाशिक जिल्हा मॉडेल म्हणून विकसीत करण्याची गरज: दत्ता भालेराव

पर्यटनासाठी नाशिक जिल्हा मॉडेल म्हणून विकसीत करण्याची गरज: दत्ता भालेराव

googlenewsNext
ठळक मुद्देअर्थसंकल्पातील भरीव तरतूद स्वागतार्हपर्यटनामुळे रोजगार वाढेल

नाशिक- महाविकास आघाडी सरकारच्या पहिल्याच अर्थसंकल्पात पर्यटन क्षेत्रासाठी १४०० कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली असून त्यामुळे राज्य सरकारलापर्यटन विषयक गांभिर्य असल्याचे स्पष्ट झाले आहे. राज्य सरकारने आता नाशिक सारखा सुवर्ण त्रिकोणातील एक जिल्हा पर्यटनासाठी मॉडेल म्हणून विकसीत करावा अशी मागणी नाशिक येथील पर्यटन व्यवसायिकांच्या संघटनेचे (तान) माजी अध्यक्ष दत्ता भालेराव यांनी केली आहे. भालेराव यांनी राज्यातील आणि नाशिकमधील पर्यटनासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले आहेत. त्या पार्श्वभूमीवर त्यांच्याशी साधलेला संवाद.

प्रश्न : राज्य सरकारच्या वतीने अर्थसंकल्पात केवळ पर्यटनासाठी करण्यात आलेल्या तरतूदींविषयी काय वाटते ?
भालेराव : मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सादर करण्यात आलेल्या पहिल्याच अर्थसंकल्पात पर्यटन व्यवसायाची व्याप्ती व क्षमता लक्षात घेऊन सुमारे १४०० कोटी रूपयांची भरघोस तरतूद करण्यात आली आहे. पर्यटन क्षेत्राला दिलासा देणारी ही बाब आहे. मात्र त्यापेक्षा महत्वाचे म्हणजे राज्य सरकारला या क्षेत्राचे महत्व कळाले हे खूप महत्वाचे आहे. मुळात आदित्य ठाकरे यांनी नवीन मंत्री मंडळात या व्यवसायाची धुरा सांभाळली, तेव्हाच काही तरी सकारात्मक होईल अशी अपेक्षा होती. त्यानुसार अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पात १४०० कोटी रूपयांची तरतूद करून देश विदेशातील पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी राज्य सज्ज करण्याची तयारी केली आहे.

प्रश्न: पर्यटनविषयक तरतूदीचा काय फायदा होईल असे वाटते ?
भालेराव: निसर्गाने महाराष्टÑावर साधन संपत्तीची मुक्त उधळण केली आहे. ऐतिहासीक गड किल्ले, पुरातन मंदिरे, ७२० किलो मीटरचा अथांग सागर किनारा, बारमाही उत्तम हवामान, उद्योग व्यवसायानिमित्त जगाच्या कानाकोपऱ्यातून येणारे नागरीक, नैसर्गिक बंदरे, या माध्यमातून नियोजनबध्द विकास केलाच तर पर्यटन हा राज्याचा प्रमुख व्यवसाय होऊ शकतो. या माध्यमातून लाखो युवकांना रोजगार मिळू शकतो. इतकी पर्यटन क्षेत्राची ताकद आहे. त्यामुळे अर्थसंकल्पातील तरतूदीचा योग्य कामासाठी वापर करावा, पर्यटनासाठी सरकारने रस्ते बांधणीवर भर द्यावा असे वाटते.

प्रश्न: पर्यटनाचा नाशिकच्या दृष्टीने काय उपयोग होऊ शकतो.
भालेराव: सुवर्ण त्रिकोणातील शहर म्हणून नाशिकचे विशेष महत्व आहे. येथे धार्मिक पर्यटन आहे, त्याच बरोबर गड किल्ले आहेत. अ‍ॅग्रो आणि वाईन टुरिझम देखील आहे. महत्वाचे म्हणजे मुंबई- पुण्याहून जवळ आहे. दळणवळणाची साधने उपलब्ध आहेत. त्यामुळे राज्य सरकारने निधीची तरतूद केल्यानंतर संपूर्ण राज्यातील पर्यटन क्षेत्राचा एकावेळी कायापालट शक्य नसला तरी नाशिकला एक मॉडेल जिल्हा म्हणून विकसीत केले तरी उपयुक्त ठरू शकेल. एक जिल्हा असा मॉडेल ठरला तर अन्यत्र देखील याच धर्तीवर विकास होऊ शकेल. नाशिकमध्ये या आधीही पर्यटनाच्या अनेक योजना आल्या होत्या. परंतु काही साकारल्या गेल्या तर काही पुढे जाऊ शकल्या नाही.


मुलाखत- संजय पाठक

Web Title: Nashik needs to be developed as district model for tourism: Datta Bhalerao

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.