Nashik News: नाशिक सीएनजी दरवाढीविरोधात युवक राष्ट्रवादीचा काळे सोने वाटून निषेध
By संजय पाठक | Published: October 5, 2022 02:32 PM2022-10-05T14:32:16+5:302022-10-05T14:32:29+5:30
Nashik News: नैसर्गिक वायूच्या किमतीही झपाट्याने वाढत असल्याने त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने सीएनजी पंपावरील ग्राहकांना काळी आपट्याची पाने वाटप उपरोधिक आंदोलन केले.
- संजय पाठक
नाशिक – सतत वाढणाऱ्या पेट्रोल – डीझेलच्या किमतीला पर्याय म्हणून वाहनधारक नैसर्गिक वायू कडे वळलेले असताना नैसर्गिक वायूच्या किमतीही झपाट्याने वाढत असल्याने त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने सीएनजी पंपावरील ग्राहकांना काळी आपट्याची पाने वाटप उपरोधिक आंदोलन केले.
दसऱ्याच्या सणाला धन, ज्ञान आणि भक्तीची पूजा केली जाते. त्याचे प्रतिक म्हणून सोने म्हणजेच आपट्याची पाने वाटण्याची प्रथा आहे. महागाईमुळे नागरिकांचे सर्वच सणावर पाणी फिरलेले असताना मोदी सरकार नवनवीन माध्यमातून जनतेला महागाईच्या खाईमध्ये ढकलत आहे, त्यामुळे हे आंदोलन केल्याचे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष अंबादास खैरे यांनी सांगितले.
नाशिक शहरात सीएनएजीच्या दरात प्रति किलोमागे चार रुपयांची मोठी वाढ करण्यात आली आहे, त्याच्या निषेधार्थ आज करण्यात आलेल्या आंदोलनात बाळा निगळ, जय कोतवाल, विशाल डोके, निलेश भंदुरे, सागर बेदरकर, राहुल कमानकर, अमोल नाईक, डॉ.संदीप चव्हाण, निलेश सानप, संतोष भुजबळ, हर्षल चव्हाण, सुनिल घुगे आदींसह अन्य कार्यकर्ते सहभागी झाले होते.