नाशकात आता ‘पूर पर्यटन’

By admin | Published: August 4, 2016 01:31 AM2016-08-04T01:31:15+5:302016-08-04T01:33:00+5:30

दौरे सुरू : राज यांच्या पाठोपाठ अन्य पक्षांचे नेतेही येणार

Nashik now has 'flood tourism' | नाशकात आता ‘पूर पर्यटन’

नाशकात आता ‘पूर पर्यटन’

Next

 नाशिक : शहरात बुधवारी येऊन गेलेल्या महापुरानंतर आता पावसाचा जोर ओसरला असतानाच नाशिकमध्ये मात्र अभ्यागत नेत्यांचा जोर वाढण्याची शक्यता आहे. पालकमंत्र्यांपाठोपाठ नाशिकचे पालकत्व स्वीकारल्याचा दावा करणाऱ्या राज ठाकरे यांनीदेखील पूर परिस्थितीची पाहणी केली. तसेच येत्या काही दिवसात अन्य पक्षांच्या वतीने आपापल्या नेत्यांना आणण्याची तयारी सुरू झाली आहे.
शहरात २००८ मध्ये महापुराच्या वेळी असाच अनुभव आला होता. त्यावेळी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शहर पूर पर्यटन बनले होते. अनेक राजकीय नेत्यांनी आपल्या भागात भेटी देऊन पाहणी दौरे केले तसेच पूरग्रस्तांच्या मागण्यांसाठी जिल्हा प्रशासन आणि अन्य यंत्रणांकडे धाव घेतली होती. पूर कृत्रिम होता की नैसर्गिक तसेच शहरातील हरवलेली पूररेषा हा विषय राजकारणी मंडळींना आयताच मिळाला होता. त्यावरून सह्यांची मोहीम राबविणे आणि पूररेषेत बांधकामांना परवानगी मिळविणे असे प्रकार सुरू होते, आताही अशाच प्रकारे हा विषय राजकीय पटलावर येण्याची शक्यता आहे. मंगळवारी आल्यानंतर एरव्ही गायब असल्याची टीका असणारे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन तातडीने नाशिकमध्ये डेरेदाखल झाले. त्यांनी पूर परिस्थितीची पाहणी केल्यानंतर त्यांच्या समवेत आपापल्या मतदार संघांचा संबंध नसलेल्या अनेकांनी पाहणी दौरे केले. बुधवारी स्थानिक लोकप्रतिनिधी, आमदार आणि त्या त्या भागातील राजकीय नेत्यांचे पाहणी दौरे सुरू झाले आहेत. मंगळवारी पूर परिस्थितीच्या वेळी उपलब्ध न झालेले अनेक नगरसेवक बुधवारी नागरिकांना उपलब्ध झाले आहे आणि त्यानिमित्ताने पूर पर्यटन सुरू झाले.

Web Title: Nashik now has 'flood tourism'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.