नाशिकमधील चेहडी शिवारात गोळीबारात एक जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 6, 2020 09:25 PM2020-01-06T21:25:57+5:302020-01-06T21:27:50+5:30

संशयित निलेश हा दुचाकीवर पाठीमागे बसलेला होता त्याने कमरेला लावलेले गावठी पिस्तुल काढत विजयच्या दिशेने रोखून ‘माझ्या बायकोकडे वाईट नजरेने बघतो, थांब तुझा गेमच करतो’ असे बोलत गोळी झाडली.

Nashik: One injured in gunshot wounds | नाशिकमधील चेहडी शिवारात गोळीबारात एक जखमी

नाशिकमधील चेहडी शिवारात गोळीबारात एक जखमी

Next
ठळक मुद्दे‘माझ्या बायकोकडे वाईट नजरेने बघतो, थांब तुझा गेमच करतो’ नाशिकरोड पोलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल

नाशिक : नाशिकरोड पोलीस ठाणे हद्दीतील चेहडी शीवमधील ताजनपुरे मळ्यात एका गॅरेजपुढे सोमवारी (दि.६) संध्याकाळी झालेल्या गोळीबाराच्या घटनेत ४५ वर्षीय इसम गंभीर जखमी झाला. गोळीबारानंतर संशयित हल्लेखोर मनमाड पोलीस ठाण्यात जाऊन हजर झाला व त्याच्या दुसऱ्या साथीदारास नाशिकरोड पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अचानकपणे झालेल्या या गोळीबाराने परिसरात एकच धावपळ उडाली.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, नाशिक-पुणे महामार्गावरील ताजनपुरे मळा येथे राहणारे विजय यशवंत खराटे हे संध्याकाळी पावणे पाच वाजेच्या सुमारास घराजवळील वैभव गॅरेज येथे गेले होते. त्याठिकाणी वैभव केनगर, प्रकाश कदम, विशाल अवारे आदी सर्व उभे असताना खराटे हे त्यांच्याशी गप्पा मारत होते. यावेळी त्यांचा शेजारी असलेला युवक निलेश निवृत्ती भाबड हा त्याचा चुलत भाऊ सचिन दिलीप भाबडसोबत मोटरसायकलवर गॅरेजजवळ आला. संशयित निलेश हा दुचाकीवर पाठीमागे बसलेला होता त्याने कमरेला लावलेले गावठी पिस्तुल काढत विजयच्या दिशेने रोखून ‘माझ्या बायकोकडे वाईट नजरेने बघतो, थांब तुझा गेमच करतो’ असे बोलत गोळी झाडली. यानंतर निलेश व सचिन हे दोघे दुचाकीवरून पसार झाले. गोळीचा आवाज होताच आजुबाजुचे सर्व जमलेले लोक पांगले. गोळी विजयच्या उजवल्या गालात लागून जबड्यात रूतल्याने ते जमिनीवर कोसळले. तोंडावाटे वेगाने रक्तस्त्राव सुरू झाल्याने जखमी अवस्थेत विजय यांना नागरिकांनी उचलून तत्काळ जवळच्या खासगी रु ग्णालयात उपचाराकरीता दाखल केले. विजय यांची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त विजय खरात, सहाय्यक आयुक्त ईश्वर वसावे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सूरज बिजली, सुनील रोहकले यांच्यासह फौजफाटा तत्काळ घटनास्थळी दाखल झाला. दरम्यान, पोलीस अधिकाऱ्यांनी जखमी विजय यांची रूग्णालयात जाऊन पाहणी केली. त्यांच्या नातेवाईकांशी चर्चा करत माहिती घेतली. याप्रकरणी नाशिकरोड पोलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

Web Title: Nashik: One injured in gunshot wounds

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.