Nashik: शिलापूरजवळ रेल्वेच्या धडकेत एक ठार
By नामदेव भोर | Updated: June 23, 2023 15:51 IST2023-06-23T15:50:34+5:302023-06-23T15:51:51+5:30
Nashik: नाशिक शहरातील आडगाव पोलिसांच्या हद्दीतील शिलापूर उड्डाणपुलाखालील रेल्वे रुळावर ओढा बाजूने नाशिकरोडकडे जाणाऱ्या लाईनवर रेल्वेने धडक दिल्याने एका ४० वर्षाचा नागरिक जागीच ठार झाल्याची घटना गुरुवारी (दि.२२) रात्री आठ वाजेच्या सुमारास घडली आहे.

Nashik: शिलापूरजवळ रेल्वेच्या धडकेत एक ठार
- नामदेव भोर
नाशिक - शहरातील आडगाव पोलिसांच्या हद्दीतील शिलापूर उड्डाणपुलाखालील रेल्वे रुळावर ओढा बाजूने नाशिकरोडकडे जाणाऱ्या लाईनवर रेल्वेने धडक दिल्याने एका ४० वर्षाचा नागरिक जागीच ठार झाल्याची घटना गुरुवारी (दि.२२) रात्री आठ वाजेच्या सुमारास घडली आहे.
शिलापूर उड्डाणपुलाखालील मध्य रेल्वेच्या लोहमार्गावरील पोल क्रमांक १९४/३२ जवळ एक व्यक्ती रुळावरून जात असताना त्याला रेल्वेने धडक दिल्याने त्यात त्याच्या हाताला, डोक्याला व पाहायला गंभीर मार लागल्याने त्याचा मृत्यू झाला. या अपघातात मयत व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नाही. त्यामुळे आडगाव पोलिसांकडून मयताची माहिकी मिळवून त्याची ओळख पटविण्याचे प्रक्रिया सुरू असून या प्रकरणात आडगाव पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे