अहमदनगरच्या उमेदवाराला नाशिकचा विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2018 12:42 AM2018-01-29T00:42:49+5:302018-01-29T00:43:21+5:30

विधानपरिषदेच्या नाशिक शिक्षक मतदारसंघातून उमेदवार निश्चित करण्यावरून टीडीएफ (शिक्षक लोकशाही आघाडी)मधील मतभेद टोकाला गेले आहेत. नाशिक येथे उमेदवार निश्चित करण्यासाठी आयोजित टीडीएफ च्या मेळाव्यात अहमदनगरच्या उमेदवाराचे नाव पुढे आल्याने नाशिकच्या सदस्यांनी विरोध करीत मेळाव्यात गोंधळ घातला. त्यामुळे टीडीएफचा उमेदवार निश्चित करण्याचा निर्णय पुढे ढकलण्यात आला असून, येत्या चार ते पाच दिवसांत उमेदवार निश्चित करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

 Nashik opposition to Ahmednagar candidate | अहमदनगरच्या उमेदवाराला नाशिकचा विरोध

अहमदनगरच्या उमेदवाराला नाशिकचा विरोध

Next

नाशिक : विधानपरिषदेच्या नाशिक शिक्षक मतदारसंघातून उमेदवार निश्चित करण्यावरून टीडीएफ (शिक्षक लोकशाही आघाडी)मधील मतभेद टोकाला गेले आहेत. नाशिक येथे उमेदवार निश्चित करण्यासाठी आयोजित टीडीएफ च्या मेळाव्यात अहमदनगरच्या उमेदवाराचे नाव पुढे आल्याने नाशिकच्या सदस्यांनी विरोध करीत मेळाव्यात गोंधळ घातला. त्यामुळे टीडीएफचा उमेदवार निश्चित करण्याचा निर्णय पुढे ढकलण्यात आला असून, येत्या चार ते पाच दिवसांत उमेदवार निश्चित करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. नाशिक येथील औरंगाबादरोडवरील सिद्धिविनायक लॉन्स येथे नाशिक विभागीय टीडीएफ तर्फे विधान परिषदेच्या शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी उमेदवार निश्चित करण्याच्या उद्देशाने रविवारी (दि. २८) मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. परंतु या मेळाव्यात अहमदनगरच्या उमेदवाराचे नाव पुढे आल्याने नाशिकच्या मेळाव्यात नाशिकच्या उमेदवारांच्या समर्थकांनी अहमदनगरच्या उमेदवारांना जोरदार विरोध नोंदवत मेळाव्यात गोंधळ घातला. नाशिक विभागातून विधान परिषदेच्या शिक्षक मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी नाशिकचे एस. बी. देशमुख, आर. डी. निकम, अहमदनगरचे भाऊसाहेब कचरे, राजेंद्र लांडे, आप्पासाहेब शिंदे, एस. डी. लगड, जळगावचे एस. डी. भिरु ड, धुळ्याचे निशांत रंधे, संगमनेरचे विठ्ठल पानसरे व मालेगावचे अजित लाठार आदी उमेदवार इच्छुक आहेत. त्यानुसार अहमदनगर, मालेगाव, धुळे येथे झालेल्या टीडीएफच्या मेळाव्यात संबंधित जिल्ह्णातून आपल्याच जिल्ह्णाला उमेदवारी मिळावी यासाठी आग्रह धरला गेला. परंतु नाशिकच्या मेळाव्यात अहमदनगरच्या उमेदवाराचे नाव पुढे आल्याने नाशिकचे इच्छुक उमेदवार एस. बी. देशमुख व आर. डी. निकम यांच्या समर्थकांनी मेळाव्यात गोंधळ घालत यावेळी नाशिकच्याच शिक्षकाला उमेदवारी मिळावी, अशी जोरदार मागणी केली. त्यामुळे उमेदवार निश्चित करण्याची प्र्रक्रिया लांबणीवर पडली असून, टीडीएफचा अधिकृत उमेदवार येत्या चार-पाच दिवसांत घोषित करण्यात येईल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
बेडसे यांना विरोध
शिक्षक लोकशाही आघाडी (टीडीएफ)मध्ये उमेदवार निश्चितीवरून संदीप बेडसे यांच्या नावावरून मतभेद निर्माण झाले असून, शिक्षक मतदारसंघातून निवडून जाणारा उमेदवार शिक्षकच असवा, अशी मागणी करीत टीडीएफच्या एका गटाने जिल्हास्तरीय मेळावे घेऊन नाव निश्चित करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. त्यात गेल्या वेळी पराभवाचा सामना करावा लागलेल्या अहमदनगरचेच नाव पुढे येऊ लागल्याने नाशिकच्या शिक्षकांनी जोरदार विरोध केला. त्यामुळे मेळाव्यात काही काळ गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती.
छायाचित्र आर फोटोवर २८टीडीएफ


 

Web Title:  Nashik opposition to Ahmednagar candidate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.