पंचवटी एक्स्प्रेसच्या नवीन २१ बोगी दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2018 09:28 PM2018-04-11T21:28:18+5:302018-04-11T21:28:18+5:30
नाशिक : नाशिकच्या प्रवाशांची अत्यंत जिव्हाळ्याची पंचवटी एक्स्प्रेस नव्या रूपात प्रवाशांच्या सेवेत दाखल झाली असून, पुढील आठवड्यात मनमाडहून नवीन बोगींसह पंचवटी एक्स्प्रेस धावणार आहे. या गाडीच्या बोगींमध्ये बदल करण्याची मागणी अनेक वर्षांपासून होत आहे.

नाशिकहून मुंबईला जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी पंचवटी एक्स्प्रेस ही महत्त्वाची गाडी मानली जाते. मनमाड आणि नाशिकरोड स्थानकातून या गाडीने दररोज मुंबईला जाणाºया प्रवाशांची संख्या मोठी असते. पंचवटी एक्स्प्रेसला असलेल्या पासधारकांची बोगीदेखील भरगच्च असल्याने नियमित प्रवााशांची संख्या लक्षात येते. या गाडीत काही बदल करण्याची मागणी रेल परिषदेच्या वतीने करण्यात आली होती.
१ नोव्हेंबर १९८५ पासून पंचवटी एक्स्प्रेस धावत आहे. मनमाड ते मुंबई हे २६१ किलोमीटरचे अंतर ही गाडी वेगात पार करते. आता ४२ वर्षांनंतर या गाडीला नवे रंगरूप मिळाले आहे. इंटरसिटीचा दर्जा असलेली पंचवटी एक्स्प्रेस आदर्श गाडी व्हावी यासाठी रेल परिषदेने उपक्रम आखला होता. त्यानुसार रेल्वे प्रशासनाशी सातत्याने पाठपुरावा केल्याने पंचवटी एक्स्प्रेसला २१ नवीन बोगी मिळाल्या आहेत. या गाडीसाठी तयार करण्यात आलेल्या नवीन बोगी चेन्नई येथील ‘इंटिग्रल कोच फॅक्टरी’ येथे बांधणी करण्यात आलेली आहे. या गाडीचे संपूर्ण नवीन कोच येवला येथे दाखल झाले आहेत. या बोगीचे अंतर-बाह्य रंग बदलण्यात आले असून स्वरूपातही बदल करण्यात आले आहेत.