राज्यभरात राबविणार ‘नाशिक पॅटर्न’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2021 04:18 AM2021-01-19T04:18:21+5:302021-01-19T04:18:21+5:30
सोमवारी (दि.१८) देशमुख नाशिक दौऱ्यावर होते. दुपारी विश्रामगृहावर पक्षाच्या काही नेत्यांची भेट घेतल्यानंतर देशमुख यांनी त्र्यंबकरोडवरील महाराष्ट्र पोलीस अकादमीला ...
सोमवारी (दि.१८) देशमुख नाशिक दौऱ्यावर होते. दुपारी विश्रामगृहावर पक्षाच्या काही नेत्यांची भेट घेतल्यानंतर देशमुख यांनी त्र्यंबकरोडवरील महाराष्ट्र पोलीस अकादमीला भेट दिली. यावेळी अकादमीमधील आंतरराष्ट्रीय दर्जाचे हॉकी मैदान, अँपिथिएटर, रेन हार्वेस्टिंगच्या पर्यावरणपूरक प्रकल्पाची पाहणी केली. यानंतर शहरासह जिल्ह्यातील पोलीस अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली. या बैठकीत ते म्हणाले, नाशिक परिक्षेत्रातील नाशिक, अहमदनगर, जळगाव, धुळे, नंदुरबार या पाच जिल्ह्यांच्या पोलीस अधीक्षकांंनी ज्याप्रमाणे विशेष परिश्रम घेत पोलीस महानिरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली आपआपल्या जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांत शेतकऱ्यांनी दाखल केलेल्या फसवणुकीच्या तक्रारींचा निपटारा करत गांभीर्याने तपास सुरू केला. अवघ्या तीन महिन्यांत उत्तर महाराष्ट्रातील तब्बल १९९ शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. बुडालेले एकूण आठ कोटी रुपये बळीराजाच्या पदरात पडले असून उर्वरित सहा ते सात कोटी रुपयांचीदेखील वसुली व्यापाऱ्यांकडून केली जात आहे. शेतकऱ्यांना बुडालेले १५ कोटी रुपये पुन्हा मिळवून देण्याचे नाशिक परिक्षेत्रातील पोलीस दलाने ठेवलेले ‘लक्ष्य’ निश्चितच राज्यातील अन्य परिक्षेत्रांकरिताही प्रेरणादायी असल्याचे देशमुख यावेळी म्हणाले. तसेच नाशिक ग्रामीण पोलिसांनी कोरोना काळात मालेगावमध्ये आपले कर्तव्य चोखपणे बजावत एक वेगळा आदर्श राज्यापुढे ठेवल्याचे त्यांनी यावेळी अधोरेखित केले.
याप्रसंगी अपर पोलीस महासंचालक संजीवकुमार, पोलीस महानिरीक्षक डॉ. प्रताप दिघावकर, प्रबोधिनीच्या संचालक अश्वती दोरजे, पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय, अधीक्षक सचिन पाटील यांच्यासह पोलीस उपायुक्त, उपविभागीय पोलीस अधिकारी उपस्थित होते.
---
फोटो आर वर १८ देशमुख नावाने (सिंगल)
--
फोटो आर वर १८पीटीसी नावाने सेव्ह.
कॅप्शन : महाराष्ट्र पोलीस अकादमीमध्ये आढावा बैठकीत बोलताना गृहमंत्री अनिल देशमुख. समवेत अश्वती दोरजे, अपर पोलीस महासंचालक संजीवकुमार.