नाशिक पोलीस : पोलीस हवालदार तिडके यांचे अपघाती निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2018 10:13 PM2018-03-04T22:13:56+5:302018-03-04T22:13:56+5:30

पहाटे पावणेसहा वाजेच्या सुमारास हा अपघात घडला. या अपघातात मोटारचालक तिडके यांचे चुलत सासरे रमेश सोनवणे (रा. खेडगाव) यांचाही मृत्यू झाला. उर्वरित दोन प्रवासी जखमी झाले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

Nashik Police: Accidental Death of Police Havildar Tidke | नाशिक पोलीस : पोलीस हवालदार तिडके यांचे अपघाती निधन

नाशिक पोलीस : पोलीस हवालदार तिडके यांचे अपघाती निधन

Next
ठळक मुद्दे पहाटे पावणेसहा वाजेच्या सुमारास अपघातपार्थिवावर मूळ गावी कसबे-सुकेणे स्मशानभूमीत अंत्यसंस्कार मोटारीवरील नियंत्रण सुटले व मोटार दुभाजकावर जाऊन आदळली

नाशिक : येथील पोलीस नियंत्रण कक्षामध्ये नेमणूक असलेले बबनराव निवृत्ती तिडके (५१) यांचे रविवारी (दि.४) मंचरजवळ महामार्गावर अपघाती निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर निफाड तालुक्यातील कसबे सुकेणे या मूळ गावी रात्री अंत्यसंस्कार करण्यात आले.
याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी, तिडके हे पुणे येथे हरविलेल्या भाचीला आणण्यासाठी नातेवाइकांसोबत गेले होते. तेथून परतीचा प्रवास करताना त्यांची मोटार (एम.एच १५ ईअ‍े ५१५१) मंचर शिवारात पोहचली असता भोरवाडीजवळ मोटारीपुढे अचानक कुत्रा आडवा पळाल्यामुळे त्यांच्या सास-यांचा मोटारीवरील नियंत्रण सुटले व मोटार दुभाजकावर जाऊन आदळली. पहाटे पावणेसहा वाजेच्या सुमारास हा अपघात घडला. या अपघातात मोटारचालक तिडके यांचे चुलत सासरे रमेश सोनवणे (रा. खेडगाव) यांचाही मृत्यू झाला. उर्वरित दोन प्रवासी जखमी झाले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. तिडके हे मागील वर्षभरापासून पोलीस नियंत्रण कक्षामध्ये कार्यरत होते. ते पंचवटीमधील हनुमाननगर येथे कुटुंबासमवेत राहत होते. १९८८ साली नाशिक पोलीस दलात तिडके भरती झाले होते. १९९१ साली आयुक्तालय अस्तित्वात आल्यानंतर त्यांनी पंचवटी, नाशिकरोड, शहर वाहतूक शाखेत नोकरी केली. शेतकरी कुटुंबातून तिडके पुढे आले होते. त्यामुळे सामाजिक प्रश्नांची त्यांना जाणीव होती. त्यांनी पोलीस दलात सेवा करताना सामाजिक संबंधही तितकेच जोपासले होते. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुली, मुलगा, दोन भाऊ, जावई, असा परिवार आहे. मुलगा बारावीला शिकत आहे. शोकाकुल वातावरणात त्यांच्या पार्थिवावर मूळ गावी कसबे-सुकेणे स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

Web Title: Nashik Police: Accidental Death of Police Havildar Tidke

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.